शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत सदस्यांनी बंद पाडले काम

By admin | Updated: February 5, 2015 00:13 IST

पट्टणकोडोली पाणी योजना : सरपंच, सदस्य यांच्यात वादावादी

पट्टणकोडोली : पाणी पंचगंगा नदीतून आणायचे की दूधगंगा नदीतून या मुद्द्यावरून अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेली पट्टणकोडोलीतील पाणी योजनेचे काम बुधवारी सुरू होताच ग्रामपंचायत सदस्यांनी बंद पाडले. यावेळी सरपंच व सदस्य यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यामुळे कोट्यवधीची ही योजना रखडण्याची शक्यता आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीतील अंतर्गत राजकीय वादामुळेच योजनेचे काम बंद पाडले असल्याची नागरिकांची भावना असून त्याविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.पट्टणकोडोलीसाठी जिल्हा परिषद अंतर्गत राष्ट्रीय पेयजल योजनेतून सहा कोटींची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. या योजनेला प्रारंभापासूनच काही सदस्यांनी विरोध केला होता. पंचगंगा की दूधगंगा नदीवरून पाणी आणायचे यावरून मोठे वादळ निर्माण झाले होते. यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही झाले. या सर्व घडामोडींमुळे सुरू झालेले काम थांबले. दरम्यान, या योजनेसाठी विशेष ग्रामसभा घेतली. या सभेमध्ये राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून कोणत्याही परिस्थितीत योजनेचे काम करा, असे सर्व पदाधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी ठणकावले. त्यानुसार बुधवारी या योजनेचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. प्रभाग क्रमांक तीनमध्ये मुल्ला गल्ली येथे खुदाई सुरू असताना बुधवारी त्याच प्रभागातील सदस्य मदन चौगुले व पोपट बाणदार यांनी काम बंद पाडले. ( वार्ताहर )आज कामाबाबत बैठकया पाईपलाईनसाठी खुदाई करताना नवीनच करण्यात आलेल्या रस्त्यांची दुरवस्था होणार आहे. त्यामुळे खुदाई रस्त्याच्या मध्येच करायची, की रस्त्याच्या बाजूने करावयाची याबाबत वाद उपस्थित झाल्याने गुरुवारी याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे.मुल्ला गल्ली येथे अगदी गटारीला लागून खुदाई सुरू आहे. त्यामुळे भविष्यात गटारीचे पाणी यामध्ये मिसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही बाजूऐवजी रस्त्यामध्येच खुदाई केल्यास नागरिकांना याचा फायदा होईल, त्यासाठी काम थांबवले आहे.- मदन चौगुले, ग्रामपंचायत सदस्यप्र्रभाग क्र. तीनमध्ये पाण्याची अडचण असल्याने मुल्ला गल्ली येथे प्रथम पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने बुधवारी खुदाईचे काम सुरू करण्यात आले. रस्त्यांची दुरवस्था होऊ नये म्हणून रस्त्याच्या बाजूने खुदाई सुरू असताना बुधवारी काही संस्थांनी जाणीवपूर्वक काम थांबविले आहे. वादविवाद न करता पाण्याचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे.- सुलभा रजपूत, ग्रामपंचायत सदस्या.