शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुका मुदतीतच

By admin | Updated: June 28, 2015 23:18 IST

जे. एस. सहारिया : पुढे ढकलणे अशक्य; जिथे शक्य आहे, तिथे तारखांत बदल

कोल्हापूर : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम तयार करताना आषाढी वारीचा विचार केला होता; पण काही जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींचे नवीन सदस्य मंडळ मुदतीत अस्तित्वात येणे गरजेचे असल्याने तारखांमध्ये बदल करता आला नसल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मात्र, जिथे शक्य आहे, तिथे ४ आॅगस्टनंतर मतदान ठेवल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात २५ जुलैला ११ जिल्ह्यांतील १७७९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे, तर ६३२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होत आहे. दुसऱ्या टप्प्यात ४ आॅगस्टला २३ जिल्ह्यात ७०१९ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत असून, १२१२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर ५७ ठिकाणी पोटनिवडणुका होत आहेत. ही निवडणूक ऐन आषाढी वारीमध्येच येत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानही वारीतील मुख्य वाखरी येथील रिंगण सोहळ्यादिवशीच ठेवले आहे. राज्यातून लाखो भाविक वारीसाठी तीन आठवडे पंढरपूरच्या मार्गावर असतात. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम होणार असल्याने मतदानाची तारीख २५ ऐवजी २९ जुलै करावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांनी निवडणूक कार्यालयाकडे केली आहे. याबाबत निवडणूक आयोगाची भूमिका नेमकी काय आहे, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, राज्यातील पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम तयार करताना आषाढी वारीबाबत विचारविनिमय झाला; पण मुदत संपण्यापूर्वी नवीन सदस्य मंडळ अस्तित्वात येणे बंधनकारक असल्याने तत्पूर्वीच निवडणुका घेणे गरजेचे होते. त्यामुळे जिथे शक्य होते, त्या ठिकाणी ४ आॅगस्टला मतदान ठेवले असल्याचे जे. एस. सहारिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दृष्टिक्षेपात ग्रामपंचायत निवडणुकापहिला टप्पा : २५ जुलैला मतदानजिल्ह्यांची संख्यासार्वत्रिक निवडणुकापोटनिवडणुका होत लागलेल्या ग्रामपंचायतीअसलेल्या ग्रामपंचायती११ १७७९ ६३२दुसरा टप्पा : ४ आॅगस्टला मतदान२३ ७०१९ १२१२