शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकास अधिकारी पदाचा संगीत-खुर्चीचा खेळ

By admin | Updated: March 25, 2015 00:47 IST

शिरोळ ग्रामपंचायतीची अवस्था : वर्षापासून कायमस्वरूपी अधिकारीच नाही, दीड महिन्याला बदली अधिकारी

शिरोळ : महसूल उत्पन्नात आघाडीवर व जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरोळ ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास अधिकारी पदावरून संगीत-खुर्चीचा खेळ सुरू आहे. दीड महिन्याला एक बदली ग्रामविकास अधिकारी याठिकाणी काम करीत असल्यामुळे कार्यालयीन कामकाजाबरोबर विकासकामांना ‘खो’ बसत आहे. कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी नेमावा, या मागणी अर्जाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविली आहे. गेल्या वर्षभरापासून अशी परिस्थिती सुरू आहे.याप्रश्नी सरपंच सुवर्णा कोळी व उपसरपंच पृथ्वीराज यादव यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले असून, शिरोळ ही जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. गेले वर्षभर कायमस्वरूपी पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसल्याने कारभार ठप्प झाला आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती व इतर शासकीय कार्यालयांना लागणारे जन्म-मृत्यू दाखले, मिळकत दाखले व शैक्षणिक आवश्यक दाखले मोठ्या प्रमाणात लागत असतात. मात्र, कार्यालयात ग्रामविकास अधिकारी नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या न्यायालयीन कामासाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांना उपस्थित राहावे लागते. त्यामुळे कायमस्वरूपी अधिकारी मिळावा, अशी लेखी मागणी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र, कोणतीच कारवाई न झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकाऱ्यांची नेमणूक न झाल्यास पंचायत समितीसमोर आमरण उपोषण, घेराव, टाळे ठोक आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)आंदोलनाचा इशारा-- जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत असतानाही कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी मिळत नाही, ही खंत आहे. दीड महिन्याला ग्रामविकास अधिकारी बदलून दुसरा येतो. ४० हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी मिळावा; अन्यथा येत्या आठवड्याभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपसरपंच पृथ्वीराज यादव यांनी दिला आहे.वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का ?ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांची संख्या कमी असल्याचे पंचायत समितीतून सांगण्यात येत आहे. वास्तविक तालुक्याचे गाव असलेल्या शिरोळला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी नेमणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रश्नी लक्ष घालून खासदार व आमदार असणाऱ्या गावाला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.