शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक अपात्रतेबाबत सरकार म्हणणे मांडणार

By admin | Updated: February 3, 2017 00:34 IST

सर्वोच्च न्यायालय : आज सुनावणी; जीव टांगणीला

कोल्हापूर : निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मिळावी म्हणून दाखल झालेल्या याचिकेवर आज, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुनावणीवेळी राज्य सरकारकडून म्हणणे मांडले जाण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील सुमारे ४०० हून अधिक नगरसेवक अडचणीत आल्यामुळे सुनावणीकडे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेवर निवडून आलेल्या नगरसेवकांना निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत राज्य निवडणूक आयोगास जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे; परंतु राज्यातील अनेक नगरसेवकांना जातपडताळणी समितीकडून वेळेत वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेतील २० नगरसेवकांचाही समावेश आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्याबाबत निवडणूक आयोगाने राज्य सरकारला कळविले. या आदेशामुळे अपात्रतेची एकतर्फी कारवाई होईल, या भीतीने कोल्हापूर महानगरपालिकेतील २० नगरसेवकांच्यावतीने महापौर हसिना फरास यांनी सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव्ह पीटिशन (एस.एल.पी.) दाखल केली आहे. अशाच प्रकारच्या एस. एल. पी. राज्यभरातील अन्य काही नगरसेवकांकडूनही दाखल केल्या आहेत. त्यावर दि. २० जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात न्या. चलामेश्वर व न्या. सप्रे यांच्यासमोर एकत्र सुनावणी झाली होती. सर्वोच्य न्यायालयाने राज्य सरकारचे याबाबत काय म्हणणे आहे, ते दोन आठवड्यांत सादर करावेत, असे निर्देश दिले होते. दोन आठवड्यांची मुदत आज, शुक्रवारी संपत आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीवेळी राज्य सरकारला त्यांचे म्हणणे न्यायालयासमोर सादर करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)आमचा दोष काय? नगरसेवकांना विभागीय जातपडताळणी समितीकडून वेळेत जातवैधता प्रमाणपत्रे देण्यात आली नाहीत. समितीने तसे लेखी कबुलीपत्र राज्य निवडणूक आयोगास दिले आहे. राज्य सरकारनेच कायदा केला आणि त्यांनीच नेमलेल्या समितीने वेळेत जातवैधता प्रमाणपत्रे दिली नाहीत. ही कायदा आणि कारवाई यातील विसंगती आहे. त्यात नगरसेवकांचा काही एक दोष नाही, असा दावा महापौर हसिना फरास यांचा आहे. कारवाईस राज्य सरकारही नाखूश विभागीय जातपडताळणी समितीने वेळेत सुनावणी पूर्ण केली नाही, परिणामी सहा महिन्यांची मुदत टळून गेली. हा तांत्रिक मुद्दा असला तरी कायद्याचाही भंग झाला आहे. या प्रकारामुळे राज्यातील सुमारे ४०० वर नगरसेवकांना अपात्र ठरवावे लागेल, अशी शक्यता असल्याने राज्य सरकारही कारवाई करण्यास नाखूश आहे. मात्र, ही सगळी प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत बसवूनच निर्णय घेणे उचित होणार आहे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयातून कारवाईला स्थगिती मिळविणे आणि कायद्यात सुधारणा करणे, असे दोन पर्याय सरकारसमोर आहेत.