शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजमध्ये राजकीय वादळ घुमणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 01:01 IST

कोल्हापूर : महाविद्यालय आणि विद्यापीठातील विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका तब्बल २५ वर्षांनंतर खुल्या पद्धतीने होणार आहेत; मात्र त्यातील वयाची २५ ...

कोल्हापूर : महाविद्यालय आणि विद्यापीठातील विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका तब्बल २५ वर्षांनंतर खुल्या पद्धतीने होणार आहेत; मात्र त्यातील वयाची २५ वर्षांची मर्यादा वाढायला हवी, आचारसंहिता शिथिल करावी, वयोमर्यादा बरोबर योग्य आहे, या आचारसंहितेमुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना नेतृत्व करता येईल, अशा संमिश्र प्रतिक्रिया कोल्हापुरातील विविध विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी व्यक्त केल्या.नवीन महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ आणि महाविद्यालयात खुल्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जाणार आहेत. नव्या रचनेत विद्यार्थी मंडळाऐवजी महाविद्यालय आणि विद्यापीठ विद्यार्थी परिषद अस्तित्वात येणार आहे. त्यासाठी १ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर दरम्यान महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठात निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे; मात्र या निवडणुकीसाठीची पात्रता आणि आचारसंहितेबाबत विद्यार्थी संघटनांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.या संघटना आणि विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण मंडळाकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.आचारसंहितेतील मुद्देमहाविद्यालय, विद्यापीठाच्या परिसरात मेळावे घेणे, मिरवणुका काढण्यास परवानगी नाही.राजकीय पक्ष, इतर संघटनांचा सहभाग, त्यांचे बोधचिन्ह आणि छायाचित्र वापरता येणारनाही.प्रवेश वैध असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मतदानाचा अधिकार.निवडणुकीसाठीची पात्रता, नियम२५ वर्षे वयाच्या आतील विद्यार्थी निवडणुकीसाठी पात्र आहेत.मान्यताप्राप्त, नियमित, पूर्णवेळ अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यालाच निवडणूक लढविता येणार आहे.एकाच वर्गात पुन्हा प्रवेश घेतलेल्या, एटीकेटीधारक विद्यार्थ्याला निवडणूक लढविता येणार नाही.राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाºया उमेदवारांना जात प्रमाणपत्र बंधनकारक असेल. त्याची तपासणी निवडणूक अर्ज भरताना केली जाईल.एका विद्यार्थी मतदाराला पाच पदांसाठी मतदान करावे लागणार आहे. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, राखीव प्रवर्गातील प्रतिनिधी आणि वर्गप्रतिनिधी यांचा समावेश आहे.राजकीय ‘लेबल’ लावल्यास कारवाई होणार ?या निवडणुकांच्या नव्या नियमानुसार उमेदवाराला पक्षीय, संघटनांचे लेबल लावता येणार नाही. तसे झाल्यास या उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येणार आहे. या निवडणुकीत अप्रत्यक्षपणे पक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग राहणार, यात शंका नाही. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर विजयी उमेदवारास राजकीय पक्षाचे लेबल लावल्यास त्यावर कारवाई होणार का? याचे उत्तर मात्र अनुत्तरीत असल्याची प्रतिक्रिया राज्य वनविकास महामंडळाचे माजी संचालक माणिक पाटील-चुयेकर यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.निवडणूक कार्यक्रम ३० जुलैपर्यंत जाहीर करणारया निवडणुकीसाठी यंत्रणा उभारणी आणि त्यासाठी येणाºया अडचणींची माहिती घेतली जात आहे. निवडणूक कार्यक्रम दि. ३० जुलैपर्यंत जाहीर करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाची तयारी सुरू असल्याची माहिती विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांनी दिली.