शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांनी गरिबांसाठीच्या योजना बंद केल्या:हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:57 IST

सेनापती कापशी : वीस वर्षे आमदार त्यातही पंधरा वर्षे मंत्री म्हणून काम करीत असताना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना मतदारसंघात प्रभावीपणे राबविल्या आहेत. विधानसभेत कायदे केले व विकासाचा स्तर कायमपणे वाढवत गेलो. पण, गेली चार वर्षे विरोधी सरकार आल्यामुळे गोरगरीब जनतेसाठी आम्ही सुरू केलेल्या योजना आमच्या डोळ्यांदेखत बंद पडत ...

सेनापती कापशी : वीस वर्षे आमदार त्यातही पंधरा वर्षे मंत्री म्हणून काम करीत असताना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना मतदारसंघात प्रभावीपणे राबविल्या आहेत. विधानसभेत कायदे केले व विकासाचा स्तर कायमपणे वाढवत गेलो. पण, गेली चार वर्षे विरोधी सरकार आल्यामुळे गोरगरीब जनतेसाठी आम्ही सुरू केलेल्या योजना आमच्या डोळ्यांदेखत बंद पडत आहेत. विकासकामांवरही दूरगामी परिणाम झाला आहे. जनतेने याची गंभीर दखल घेऊन वेळीच सावध होणे गरजेचे आहे. गणरायाच्या कृपेमुळे जर पुन्हा संधी मिळालीच, राज्यात जर आमचे सरकार सत्तेवर आलेच तर बंद पडलेल्या सर्व योजना तर पुन्हा चालू करणारच आहे. याशिवाय सहाशे रुपयांची पेन्शन दोन हजार केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथे विविध विकासकामांचा प्रारंभ व उज्ज्वल गॅस योजनेअंतर्गत गॅस वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.त्यांच्या हस्ते बेलेवाडी काळम्मा ते माध्याळ या रस्त्याचा, स्मशानभूमीकडे जाणाºया रस्त्याचा, दलित वस्तीतील गटर बांधकाम, आदी कामांचा प्रारंभ तसेच उज्ज्वल गॅस योजनेतील लाभार्थींना गॅसचे वाटप करण्यात आले.मुश्रीफ म्हणाले, उज्ज्वल योजनेंतर्गत सर्वसामान्य महिलांना मिळणाºया गॅस टाकीला सबसिडी नाही. सुरुवातीला मोफत मिळाल्यानंतर महिन्याला साडे आठशे रुपये देऊन गॅसटाकी विकत घेण्यासारखी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे या योजनेअंतर्गत वाटप झालेल्या लाभार्थींना गॅसच्या टाकीला ५० टक्के सबसिडी मिळाली पाहिजे, सरपंच सागर पाटील यांनी प्रास्ताविक, तर आर. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी हरी पाटील, हिंदुराव मुदाळकर, आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.नोटांनी भरलेली गाडी घेऊन फिरावे लागेलरस्त्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेवर मुश्रीफ म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील रस्त्यावरचे खड्डे पाहून मला लाज वाटते, असे वक्तव्य केले होते. गडकरींना याची लाज वाटली, पण या खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना लाज वाटत नाही. उलट ते खड्डा दाखवा आणि दहा हजार मिळवा असे आवाहन करीत आहेत. रस्त्यावरचे खड्डे जर पाहिले तर त्यांना नोटांनी भरलेली गाडी घेऊनच फिरावे लागेल, अशी अवस्था महाराष्ट्रातील रस्त्यांची झाली आहे.