शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने मूलभूत सेवा कर माफ करावेत

By admin | Updated: March 16, 2015 00:13 IST

धर्मशाळा प्रतिनिधी अधिवेशनातील सूर : गोव्यासह विविध ठिकाणचे प्रतिनिधी उपस्थित

कोल्हापूर : धर्मशाळा या नावाने नोंदणीकृत होणाऱ्या संस्था भक्तांच्या, प्रवाशांच्या, पर्यटकांच्या सोयीसाठी अल्पदरात निवासस्थानांची व्यवस्था करतात. यामागे सेवाभाव हा महत्त्वपूर्ण भाग असतो. अशा संस्थांना विविध कर आकारणी शुल्क माफ करावे, असा सूर धर्मशाळांच्या प्रतिनिधींच्या एकदिवसीय अधिवेशनात रविवारी उमटला.कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी भक्त मंडळ, धर्मशाळेमार्फत ताराबाई रोडवरील धर्मशाळेच्या सभागृहात या एकदिवसीय अधिवेशनाचे आयोजन केले होते. अधिवेशनाला गणपतीपुळे, पावस, औदुंबर, सोलापूर, बेळगाव, मारजोळ (गोवा), पंढरपूर, पैजारवाडी, नृसिंहवाडी व कोल्हापुरातील धर्मशाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार मराठे व धर्मशाळा प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले.यावेळी सौरऊर्जा प्रकल्प, दूरध्वनी, इंटरनेट, फॅक्स, मेल व इतर बाबींबाबत विशेष सवलत प्राप्त करून द्यावी, मंदिराजवळ असणाऱ्या काही कुटुंबांकडून घरगुती भक्तनिवास व्यवस्था केली जाते. त्यांना शासनदरबारी नोंदणीसह परवाने द्यावेत; तसेच सर्व धर्मशाळा संस्थांनी एकत्रित येऊन, संघटितपणे विचार करून धर्मशाळा व भक्तनिवासांच्या सोयी-सुविधांबाबत एकत्रितपणे व्यवस्थापनाबाबत धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे, असे मत अधिवेशनात यावेळी अनेक प्रतिनिधींनी व्यक्त केले.अधिवेशनाला सोलापुरातील श्री क्षेत्र जोतिबा भक्त मंडळाचे अनंत सावंत, बेळगाव येथील भास्कर पंत बाळेकुंद्री, भास्कर रसाळ, औदुंबर येथील श्री नारायण स्वामी भक्तनिवासचे बाजीराव सूर्यवंशी, गणपतीपुळे येथील श्री क्षेत्र गणपती संस्थानचे वैभव सोबळकर, गोवा येथील म्हाळसादेवी मारजोळचे श्याम सुंदर सादले, पंढरपूर येथील भावसार धर्मशाळेचे सुरेशचंद्र करमुसे, पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे उमेश जामसांडेकर, पैजारवाडी येथील परमपूज्य सद्गुरू चिले महाराज समाधी मंदिरचे बाबासाहेब चव्हाण, नृसिंहवाडी दत्तभक्त मंडळ उपासना धामचे शिवराम जोशी यांच्यासह कोल्हापुरातील विविध धर्मशाळांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता. सहकार्यवाह राजू मेवेकरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष नानासो नष्टे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) धर्मशाळांसाठी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावातधर्मशाळा या नावाने नोंदणीकृत होणाऱ्या संस्था भक्तांच्या, प्रवाशांच्या, पर्यटकांच्या सोयीसाठी काम करत असतात. त्यांना गावठाण, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व राज्य शासनाने जागा उपलब्ध करून द्यावात. अशा धर्मशाळांचा जागा, वीज, घरफाळा, पाणी, आयकर, सेवाकर, शिक्षण कर याबाबतच्या विविध कर आकारणीच्या शुल्कामध्ये माफी मिळावी अशी मागणी या एकदिवसीय धर्मशाळा प्रतिनिधींच्या अधिवेशनात करण्यात आली.