शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने गोळ्या, लाठ्यांनी संप मोडू नये

By admin | Updated: June 4, 2017 01:37 IST

एन. डी. पाटील यांचा इशारा : संप मागे घेण्याचा निर्णय वेदनादायक

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ७० वर्षांत पहिल्यांदाच शेतकरी कुणाचेही नेतृत्व न मानता संघटित झाल्याने भवितव्य आश्वासक वाटत होते. कोणताही प्रश्न सुटलेला नसताना शेतकरी नेत्यांनी संप मागे घेऊन आत्मघातकीपणा केला. हा निर्णय वेदनादायी आहे. सरकारने सत्तेच्या बळावर शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून गोळ्या व लाठ्यांनी संप मोडू नये, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केला.शेतकरी संप मागे घेतल्यानंतर राज्यात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर प्रा. पाटील पत्रकारांशी बोलत होते. कधी नव्हे ते शेतकरी एकजुटीने रस्त्यावर उतरला होता. संपाचे मनोधैर्य टिकविण्यासाठी एकजूट कायम राहणे गरजेचे होते. संप शांततेच्या मार्गाने करावा, याचा आग्रह आमचा कायम राहणार; पण सरकारला संवेदनशीलताच नसेल, तर शेतकऱ्यांनी काय करावे. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करून संप चिरडण्याचा प्रयत्न ही वृत्ती योग्य नसून, सरकारने माधव भंडारी यांच्यासारख्या वाचाळवीरांना मुसक्या घालाव्यात, असा सल्ला प्रा. पाटील यांनी दिला. संपाबाबत सरकारशी चर्चा करायला जाणार आहात का? याबाबत प्रा. पाटील म्हणाले, न बोलावता चर्चेला का जाऊ. मी काय आण्णा हजारे आहे का? आण्णांना पुन्हा एकदा या बाजारपेठेत यायचे असेल, म्हणून कदाचित ते मध्यस्थी करायला इच्छुक असतील. सरकार नेमके कोणाच्या सल्ल्याने चालते हेच कळत नाही. तेव्हा कोणत्या बिळात होता?संवेदनहीन सरकारला जाग आणण्यासाठी रस्त्यावर दूध ओतले म्हणून हळहळ व्यक्त केली जाते; दोन वर्षे लाखो क्विंटल कांदा कुजून गेला, तेव्हा हे लोक कोणत्या बिळात लपून बसले होते? असा सवाल त्यांनी केला. तूर खरेदीबाबत मेहरबानी केली का?तूर खरेदीसाठी मुदतवाढ दिल्याचे मंत्री सांगतात. शेतीमाल खरेदीची मुदत कसली घालता, मुदतवाढ करून मेहरबानी केली का? सरकारकडे आश्वासने पाळायची शक्ती नसल्याची टीका प्रा. पाटील यांनी केली.