शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीच्या काळम्मावाडी योजनेबाबत शासन सकारात्मक

By admin | Updated: March 27, 2015 23:57 IST

नगरविकास राज्यमंत्री : आयजीएमबाबत नगरपालिकेला सूचना

इचलकरंजी : काळम्मावाडी धरणातून थेट नळाद्वारे इचलकरंजी शहरास पाणी पुरविणाऱ्या योजनेविषयी शासनाचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. तसेच आयजीएम रुग्णालय ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप’ तत्त्वाने चालविण्यास द्यावा, अशी सूचना नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी नगरपालिकेच्या शिष्टमंडळास केली.इचलकरंजी नगरपालिकेकडील विविध विकासकामे, नागरी सेवा-सुविधा व शासकीय योजना याबाबत विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवारी राज्यमंत्री पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. बैठकीसाठी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे, मुख्याधिकारी सुनील पवार, बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे, पाणीपुरवठा सभापती रवी रजपुते, आरोग्य सभापती सुजाता बोंगाळे, अजित जाधव, मदन झोरे, प्रमोद पाटील, महेश ठोके, जलअभियंता बापूसाहेब चौधरी, डॉ. श्रीकांत सूर्यवंशी, नगररचनाकार डी. एस. चव्हाण, नगरसेविका, आदी उपस्थित होते. प्रारंभी आमदार हाळवणकर, नगराध्यक्ष बिरंजे, मुख्याधिकारी पवार, आदींनी नगरपालिकेच्या विविध कामांविषयी माहिती दिली.त्यानंतर राज्यमंत्री पाटील म्हणाले, इचलकरंजीस काळम्मावाडी धरणातून पाणी आणण्यासाठी जीवन प्राधिकरणाने ५२५ कोटी रुपयांच्या योजनेस मान्यता दिली आहे. त्याबाबत सरकार सकारात्मक विचार करीत आहे. नगरपालिकेचे रुग्णालय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप तत्त्वाने चालविण्यास द्यावा. त्यामध्ये रुग्णालयाकडे होणाऱ्या नफ्याची विभागणी नगरपालिका व संबंधित संस्था यांच्यात होईल. मात्र, दारिद्र्यरेषेखालील व अंत्योदय कुटुंबासाठी होणाऱ्या औषधोपचाराचा निधी शासन देईल. तसेच सरकारच्यावतीने चालू असलेल्या राजीव गांधी जीवनदायिनी, कुटुंब नियोजन, क्षयरोग निर्मूलन, एड्स, मलेरिया, आदींबाबतच्या असलेल्या योजनांचा सुद्धा निधी शासन देईल. (प्रतिनिधी)अनधिकृत बांधकाम शास्ती कायदा रद्द करण्याविषयी शासन धोरणात्मक निर्णय घेण्याचा विचार करीत आहे. हा निर्णय लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येईल. तसेच रस्ते अनुदान, अनुकंपा तत्त्वावर नोकरभरती याचाही योग्य तो विचार शासन करेल.- रणजित पाटील,नगरविकास राज्यमंत्री