मराठा समाजातील नियुक्त्या रखडलेल्या विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की, ज्यांची निवड झाली आहे,त्यांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात. न्यायालयाचा आदेश होऊनही सप्टेंबर २०२० पर्यंत त्याबाबतची कार्यवाही झालेली नाही. त्यांना ईडब्ल्यूएसची जाहिरात नसल्याने त्यामध्ये त्यांना गृहीत धरत नाहीत. तर काही विद्यार्थ्यांना सरकारने खुल्या प्रवर्गात टाकले आहे. यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना ज्या पदावर निवड झाली आहे. त्यापेक्षा खालच्या पदावर संतुष्ट रहावे लागणार आहे. या मुलांच्या पदरी मोठी निराशा येणार आहे. सरकार मराठा समाजाच्या अस्मितेशी व विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करीत आहे. तो त्यांनी थांबवावा. अन्यथा मराठा समाज भविष्यात त्यांना सडेतोड उत्तर देईल, असा इशाराहीघाटगे यांनी दिला.
मराठा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकार खेळ करीत आहे : घाटगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST