शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याबाबत सरकारकडून ठोस धोरणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:14 IST

जयसिंगपूर : लॉकडाऊन कडक होण्याच्या भीतीने भाजीपाला व फूल उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. लॉकडाऊनच्या नावाखाली भाजीपाल्याचे ...

जयसिंगपूर : लॉकडाऊन कडक होण्याच्या भीतीने भाजीपाला व फूल उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. लॉकडाऊनच्या नावाखाली भाजीपाल्याचे दर पाडले जात आहेत. कोरोना महामारीमुळे शेती पिकवायची की नाही, असा सवाल गतवर्षी शेतकऱ्यांतून उपस्थित झाला होता. पुन्हा एकदा लॉकडाऊनचे नियम कडक केले जात आहेत. नाशवंत असणाऱ्या भाजीपाल्यासाठी सरकारकडून कोणतेही ठोस धोरण नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरुवातीला आठवडा बाजार बंद करण्यात आले. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेबरोबरच मुंबईसाठी पाठविला जाणारा भाजीपाला शेतातच पडून राहिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. लॉकडाऊननंतर अतिवृष्टीमुळेदेखील शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले होते. शासनाने भाजीपाला उत्पादकांच्या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणीदेखील झाली होती. सध्या लॉकडाऊनचे नियम आणखीन कडक होत असतानाच, याचा गैरफायदा घेत एजंटांकडून भाजीपाला व फूल उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू झाले आहे. कोबीला अक्षरश: मातीमोल दर आला आहे.

लॉकडाऊन करताना या शेतीमालाचे करायचे काय, हे सुध्दा सरकारने विचारात घेतले पाहिजे. गेली वर्षभर भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट झाली आहे. गेल्यावर्षी अचानक लॉकडाऊनमुळे काहीच करता आले नाही. त्यामुळे नाशवंत असणाऱ्या शेतीमालाबाबत ठोस धोरण राबविण्याची गरज आहे.

चौकट -

दर नसल्याने कोबी शेतातच

नांदणी (ता. शिरोळ) येथील बाबासाहेब कुगे या शेतकऱ्याने वीस गुंठ्यांतील कोबी पिकाला दरच नसल्याने शेतातच तोडून टाकला. लॉकडाऊन होणार, या चर्चेमुळे सर्वत्र भाजीपाला व फळांचे दर कोसळले आहेत. याउलट ग्राहकांना चढ्या भावातच भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. एका बाजूला डिझेल-पेट्रोल दरवाढ, रासायनिक खतांची दरवाढ, वीज बिलांसाठी कनेक्शन तोडले जात आहेत, अशी परिस्थिती आहे.

कोट -

विविध अडचणीतून पिकविलेला शेतीमाल शिवारातच तोडून टाकावा लागत आहे. लॉकडाऊनचा निर्णय घेताना सरकारने भाजीपाला व फूल उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करावा. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल.

- सागर शंभूशेटे, नांदणी.

फोटो - २९०३२०२१-जेएवाय-०५, ०६ फोटो ओळ - नांदणी (ता. शिरोळ) येथील शेतकऱ्याने दर नसल्याने शेतातच कोबी तोडून टाकला आहे.