शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा कर्जमाफीसाठी शासनाच्या हालचाली

By admin | Updated: March 14, 2017 00:44 IST

बँकांकडे माहिती मागविली : सहकार आयुक्तांचे बॅँकांना आदेश; थकीत कालावधीबाबत मात्र संभ्रमावस्था

राजाराम लोंढे -- कोल्हापूर--कर्जमाफीसाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, थकीत कर्जे व कर्जदारांची माहिती बॅँकांना तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. थकीत कर्जाचा कालावधी निश्चित केला नसला तरी प्राथमिक हालचाली पाहता, दुष्काळी तीन वर्षांच्या काळातील कर्जमाफी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. केंद्रातील कॉँग्रेस आघाडी सरकारने २००९ मध्ये ७२ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. २००८ पर्यंत थकीत असणारे संपूर्ण पीक कर्ज माफ करून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता; पण प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना राज्यात उमटली आणि राज्य सरकारने सरसकट २० हजार रुपये कर्जमाफीचा निर्णय घेतला. पण, ही कर्जमाफी वादाच्या भोवऱ्यात अडकली. सगळा फायदा पश्चिम महाराष्ट्रालाच झाल्याची ओरड सुरू झाली. त्यात कोल्हापूरच्या कर्जमाफीबाबत थेट नाबार्डकडे तक्रार झाली आणि ‘अपात्र कर्जमाफी’चे गुऱ्हाळ आजअखेर सुरू आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून दुष्काळ व अतिवृष्टीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्याला पुन्हा कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राजकीय पक्षांची सुरू आहे. उभा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना शिवसेनेने कर्जमाफीची मागणी लावून धरली. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील वर्षी ‘अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर तुळजापूर येथे ‘कर्जमुक्ती अभियान’ सुरू केले. साडेसहा लाख शेतकऱ्यांनी ‘कर्जमुक्ती’चे फॉर्म संघटनेकडे जमा केले आहेत. विधिमंडळ अधिवेशनच्या पहिल्या दिवसापासून कर्जमाफीवरून कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आक्रमक झाली असून, कामकाज चालू दिलेले नाही. त्यामुळे सरकारची कोंडी झाली असून, एकूण थकीत कर्जे व कर्जदार शेतकऱ्यांची किती रक्कम याचा अंदाज सरकारकडून घेतला जात आहे. सहकार आयुक्तांनी जिल्हा उपनिबंधक व जिल्हा बॅँकांना थकीत कर्जाची माहिती मागविली आहे; पण नेमक्या कोणत्या कालावधीतील थकीत कर्जाची माहिती द्यायची याबाबत कोणतीच स्पष्टता नाही. येत्या दोन दिवसांत याबाबत स्पष्ट निर्देश येण्याची शक्यता आहे. पुनर्गठीत कर्ज अडसर ठरणार दुष्काळामध्ये राज्य सरकारने थकीज कर्जांचे पुनर्गठन करण्याचे आदेश दिले होते. त्याची परतफेड समान हप्त्यात सुरू आहे. त्यामुळे कर्जमाफीचे निकष ठरविताना पुनर्गठीत कर्जे मध्यम मुदतीमध्ये धरले तर शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात.नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाल्यानेच आम्ही ‘सात-बारा कोरा’ करण्याची मागणी केली. उत्तर प्रदेश निवडणुकीत ‘सत्ता द्या कर्जमाफी करतो’ अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तर तुम्हाला आधीच सत्ता दिली, सरकार आणखी कशाची वाट पाहतंय.- खासदार राजू शेट्टी कर्जमाफीची ताकद केंद्राचीच!राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती व राज्यासमोरील इतर आव्हाने वेगवेगळी आहेत. अशा परिस्थितीत कर्जमाफ करणे राज्य सरकारच्या आवाक्याबाहेरचा विषय आहे. केंद्र सरकारच हे करू शकते; पण ते एका राज्यापुरता निर्णय घेता येणार नाही. यासाठीच उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्जमाफीची घोषणा करून संपूर्ण देशात संदेश दिला आहे. जिल्ह्यात १५० कोटी थकीत ?जिल्ह्यातील पीक कर्जाची सर्वाधिक खाती जिल्हा बॅँकेत आहेत. जिल्हा बॅँकेच्या पातळीवर थकीत संस्था व थकीत कर्ज साधारणत: ७० कोटींपर्यंत आहे. विकास संस्था व शेतकऱ्यांच्या पातळीवर विचार करायचा झाल्यास सुमारे १५० कोटी थकबाकी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.