कऱ्हाड : पंतप्रधान नरेंद्र मोदी खिशात चेकबुक घेऊन परदेश दौरा करीत सुटलेत. हस्तांदोलन करीत बुके देणे आणि फोटो घेणे हे परराष्ट्र खात्याचे धोरण नसते; पण उद्योगपतींना खूश करण्यासाठी मोदी हे सर्व करताहेत. सध्याचे सरकार उद्योगपतींचे आहे आणि मोदी या सरकारचे प्रतिनिधी आहेत, असा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मोदी सरकारच्या वर्षपूर्तीच्या गोंगाटात खरी परिस्थिती जनतेसमोर येत नाही. शेतकरी, गरीब आणि शोषित वर्गाकडे या सरकारचे दुर्लक्ष आहे. मोदी एकाधिकारशाही गाजवीत परदेशदौरे करीत आहेत. (प्रतिनिधी)
सरकार उद्योगपतींचे, मोदी त्यांचे प्रतिनिधी!
By admin | Updated: May 25, 2015 03:27 IST