शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय यंत्रणेने लाखाचे केले बारा हजार, भरपाईवर मारली काट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 12:08 IST

धोमचा डावा कालवा फुटून मालगाव, वनगळमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. महसूल विभागाच्या पंचनाम्यात लाखांच्या नुकसानीची नोंद असताना पाटबंधारे विभागाने केलेल्या पाहणीत हेच नुकसान काही हजारांवर आणून ठेवण्यात आले. दोन्ही विभागांच्या या बार्गेनिंगमध्ये येथील शेतकऱ्यांच्या बाबतीत लाखाचे झाले बारा हजार ही म्हण तंतोतंत जुळली आहे.

ठळक मुद्देमहसूलच्या पंचनाम्यावर पाटबंधारेचे बार्गेनिंगआतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल

सागर गुजर

सातारा : धोमचा डावा कालवा फुटून मालगाव, वनगळमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. महसूल विभागाच्या पंचनाम्यात लाखांच्या नुकसानीची नोंद असताना पाटबंधारे विभागाने केलेल्या पाहणीत हेच नुकसान काही हजारांवर आणून ठेवण्यात आले. दोन्ही विभागांच्या या बार्गेनिंगमध्ये येथील शेतकऱ्यांच्या बाबतीत लाखाचे झाले बारा हजार ही म्हण तंतोतंत जुळली आहे.मालगावमधील शेतकरी देवेंद्र कल्याण कदम यांचे उकिरड्याचे शेणखत, हळद बियाणे, कडबा, जळण असे मिळून मोठे नुकसान झाले. महसूल विभागाने पंचनाम्यात हे नुकसान १ लाख ८३ हजार इतके नोंदवले. तर पाटबंधारेने हेच नुकसान केवळ ४३ हजार रुपयांवर घसरवले. संजय कृष्णा कदम यांचे महसूलच्या पंचनाम्यात ४ लाख ७० हजारांचे नुकसान झाल्याची नोंद आहे.मात्र, पाटबंधारे विभागाने हेच नुकसान १ लाख ३५ हजार रुपये इतके दाखवले.

मधुकर आनंदराव कदम यांच्या शेताचा बांध वाहून गेला. शेतातील ऊस पिकाचेही नुकसान झाले. महसूलच्या पंचनाम्यानुसार ८ लाखांचे नुकसान झाले असताना पाटबंधारे विभागाने मात्र हेच नुकसान १ लाख ३५ हजार रुपये इतके म्हणजे निम्म्यापेक्षा कमी दाखवले आहे. शंकर सीतामाम यादव यांचे तर ४ लाख ४५ हजारांचे नुकसान झाले. तेच पाटबंधारे विभागाने बार्गेनिंग करून अवघ्या ८७ हजारांवर आणले आहे.

प्रकाश भिकूलाल कदम यांचे ४ लाख २० हजारांचे नुकसान झाले असताना त्यांना पाटबंधारे विभागाने मोठा झटका देत अवघे पाच हजारांचे नुकसान दाखवले आहे. धर्माजी साहेबराव देशमुख यांच्या शेतातील ताल वाहून गेल्याने २ लाख ५0 हजारांचे नुकसान झाले. तेच नुकसान केवळ १५ हजार रुपये इतके कमी दाखविण्यात आले आहे.मालगाव ग्रामपंचायत हद्दीमधील मालगाव-अंबवडे रस्ता पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने वाहून गेला होता. हेच नुकसान महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार १ लाख ६0 हजार इतके होते. पाटबंधारे विभागाने तेच नुकसान २५ हजार रुपये इतके कमी केले. स्मशानभूमीच्या कामासाठी आणलेली सिमेंटची पोती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली होती.

ओढ्याच्या पाईपस व भरावही वाहून जाऊन सर्व मिळून ८ लाखांचे नुकसान झाले होते. तेच नुकसान पाटबंधारेच्या पाहणीत अवघे १ लाख ११ हजार इतके कमी दाखविण्यात आले आहे.वनगळ व मालगाव या दोन्ही गावांतील सर्वच शेतकऱ्यांच्या बाबतीत हा प्रकार केला गेला आहे.

मालगावातील ४४ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ७७ लाख ११ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले असताना पाटबंधारे विभागाने पाहणी करून ते ११ लाख २ हजार ७०० रुपये एवढे कमी दाखवले. वनगळ येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ५ लाख १६ हजारांचे नुकसान झाले असताना ते केवळ १ लाख ६४ हजार इतके कमी दाखविण्यात आले आहे. यामुळे भरपाई मिळाली तरी त्यातून शेतकºयांचे समाधान होणार नाही.हातात मात्र छदामही नाही...गेल्या चार महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. लाखोंचे नुकसान हजारांत दाखविण्याचे सोपस्कार शासकीय यंत्रणेने करून ठेवले; परंतु एक छदामही शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही, हे विशेष! शासकीय यंत्रणा गेंड्याच्या कातडीची असल्याने न्याय मिळण्यासाठी झगडावे लागेल, असे मत स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :DamधरणSatara areaसातारा परिसर