शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदराबाबत सरकारला गांभीर्य नाही

By admin | Updated: November 18, 2014 23:27 IST

अखिल भारतीय किसान सभा : दरासाठी आंदोलन करण्याचा इशारा

कोल्हापूर : ऊसदर नियामक मंडळाने आतापर्यंत वेळकाढूपणाची भूमिका घेतल्याने ऊसदराबाबत शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. केवळ चर्चेशिवाय काहीच केले नसून याच्या निषेधार्थ १ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान सभेच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर देण्यासाठी ऊस दर नियामक मंडळाची स्थापना केली. पण बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही. शेतकरी ऊस दराकडे डोळे लावून बसले असताना सरकार काहीच करत नाही. वास्तविक ऊस दर नियामक मंडळाच्या अध्यक्षांनी बैठकीतील वृत्तांत घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही, त्यामुळे हे सरकार ऊस दराबाबत गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होते. त्याबद्दल त्यांचा निषेध करत असल्याचे प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी सांगितले.हा हंगाम सुरू होण्यापुर्वी पहिल्या उचलीचा प्रश्न संपणे अपेक्षित होते. केंद्रात व राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपाचे सरकार आहे. त्यामध्ये खासदार राजू शेट्टी सहभागी आहेत. पण त्यांची भूमिका गोंधळात टाकणारी आहे. रंगराजन समिती ऊसाचा उत्पादन खर्च लक्षात न घेता दर ठरविते. हंगामाच्या तोंडावर साखरेचे दर पाडून शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. वास्तविक खासदार शेट्टी यांनी सर्व प्रश्नांवर संघर्ष करणे अपेक्षित होते. या वस्तूस्थितीचा विचार करून किसान सभेने ‘स्वामीनाथन समितीच्या’ शिफारसीनुसार ऊसाचा दर ठरवावा, यासाठी आंदोलन हातात घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. बैठकीस आप्पा परीट, सुभाष निकम, विकास पाटील, आनंदराव चव्हाण, तुळशीदास किल्लेदार, संभाजी यादव, बाळासाहेब कामते, आनंदा कांबळे, अनिल जंगले, प्रा. ए. बी. पाटील, भगवान पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी )