शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

गरिबांना चिरडणाऱ्या सरकारचे दिवस भरले

By admin | Updated: June 20, 2016 00:50 IST

हसन मुश्रीफ : राष्ट्रवादीची बैठक; पंधरा वर्षांची सत्तेची मस्ती जिरल्याने चांगले काम करून दाखवू

कोल्हापूर : गोरगरिबांच्या योजना बंद करून त्यांना चिरडणारे, शेतकऱ्यांना गाडणारे व पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करून विदर्भाला भरभरून देणाऱ्या राज्यातील महायुतीच्या सरकारचे दिवस भरल्याची टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. पंधरा वर्षे सत्तेत राहिल्याने आम्हाला काहीशी मस्ती आली होती; पण आता ती जिरली असून येथून पुढे आदर्श काम करून दाखवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नियोजित दौऱ्याच्या तयारीसाठी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची रविवारी कोल्हापुरात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर चौफेर हल्ला चढविला. राज्य सरकारमधील ‘बिन बुलाये मेहमान’ अशी शिवसेनेची खिल्ली उडवत आमदार मुश्रीफ म्हणाले, दीड वर्षात सरकारने सामान्य माणसांना संपविले आहे. प्रत्येक मंत्री भ्रष्टाचाराने बरबटला आहे. मुख्यमंत्र्यांनी विदर्भात किती पैसा नेला, याचा भांडाफोड आगामी अधिवेशनात करणार आहे. गरिबांना चिरडणाऱ्या सरकार फार काळ टिकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा दौरा आहे. दहा वर्षे जिल्हा परिषदेवर सत्ता होती; पण काही चुकांमुळे गेली. आता एकसंधपणे बांधणी करून पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याची शपथ घ्या, असे आवाहन करीत आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, २५ व २६ जून रोजी शरद पवार दौऱ्यावर येत आहेत, त्यांचे स्वागत जंगी करायचे असून प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना आणावे. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, प्रत्येक तालुक्यात मेळावे घेऊन पक्षमजबुतीसाठी प्रयत्न करणार आहे. मुश्रीफसाहेब, तुम्ही चिंता करू नका. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवून तिथे तुमच्या विचारांचा अध्यक्ष बसविण्याचा विडा आम्ही उचलला आहे. संगीता खाडे, महादेव पाटील, डी. बी. पिस्टे, अवधूत अपराध, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संजय पाटील-यड्रावकर यांनी मनोगत व्यक्त केले. निवेदिता माने, आमदार संध्यादेवी कुपेकर, नामदेवराव भोईटे, आर. के. पोवार, नंदिनी बाभूळकर, भैया माने, धैर्यशील पाटील, अमोल माने, अरुण इंगवले, मुरलीधर जाधव, मधुकर जांभळे, बाबूराव हजारे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) दादा, सूज उतरली की कळेल भाजपने अलीकडे कागल व गडहिंग्लजमध्ये मेळावे घेतले. यामधील गर्दी पाहून ‘मुश्रीफ यांनी मेळावा पाहिला तर त्यांना धडकी भरेल’ असे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांदादा पाटील यांनी केले. आपणाला दादांवर बोलायचे नव्हते; पण ते माझी कळ काढतात, म्हणून बोलावे लागते. ‘दादा, मेळाव्यातील गर्दी ही सत्तेची सूज आहे. ती उतरली की कळेल,’ असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.