शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग मतदारांना शासकीय मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:13 IST

कोल्हापूर : लोकशाही व्यवस्थेत सर्वसामान्य मतदारांना जसा मतदानाचा हक्कबजावता येतो, तसाच दिव्यांग मतदारांनाही मतदानाचा हक्कबजावता यावा म्हणून निवडणूक आयोगाने ...

कोल्हापूर : लोकशाही व्यवस्थेत सर्वसामान्य मतदारांना जसा मतदानाचा हक्कबजावता येतो, तसाच दिव्यांग मतदारांनाही मतदानाचा हक्कबजावता यावा म्हणून निवडणूक आयोगाने निर्देश दिले असून, त्याकरिता प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदार अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर दिव्यांग मतदारांच्या मतदानावेळी कोणतीही कसूर राहू नये म्हणून अत्यंत बारकाईने नियोजन करण्यात येत आहे.कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण अशा दोन विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांच्या याद्या निश्चित झाल्या असून, त्यांची घरपती जाऊन खात्रीदेखील करून घेण्यात आली आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये २३७, तर कोल्हापूर दक्षिणमध्ये १७६८ दिव्यांग मतदार आहेत. त्यांच्या मतदानाकरिता सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ही तयार यादी आता अंतिम टप्प्यात आली आहे.निवडणूक आयोगाने दिव्यांग व्यक्तीकरिता एक अ‍ॅप तयार केले आहे. तसेच क्रमांक १९५० हा टोल फ्री फोनही उपलब्ध करून दिला आहे. त्या फोनवर दिव्यांग व्यक्तींना संपर्क साधणे शक्य होणार आहे. ज्या दिव्यांगांना अजिबातच चालता येत नाही, तसेच दिसत नाही अशांना त्यांच्या घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत आणि मतदान झाल्यानंतर त्यांच्या घरात सोडण्यापर्यंतची सुविधा दिली जाणार आहे. जेथे दिव्यांग व्यक्ती मतदानास जाणार आहेत, त्या मतदान केंद्रावर व्हिलचेअरची सुविधा असेल. त्यांच्याकरिता असलेल्या वाहनात एक स्वयंसेवक असेल. तो त्यांना मदत करेल.ज्या व्यक्ती अंध आहेत त्यांना मतदान केंद्रावर ब्रेल लिपितील मतदान ओळखपत्र (व्होटर स्लीप) दिले जाणार आहे. ज्यांना ब्रेललिपी समजत नाही, त्यांच्याकरिता १४ ते १७ वयोगटातील स्वयंसेवक मदतीला दिले जाणार असून, ते मतदान प्रक्रियेवेळी मदत करतील. बहिर्वक्र भिंगसुद्धा मतदान केंद्रावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. सध्यातरी झोनल आॅफिसरची वाहने अशा व्यक्तींनाने-आण करण्याकरिता वापरली जाणार असून, जेथे आवश्यक आहेत तेथे काही वाहने भाड्याने घेतली जाणार आहेत.कोल्हापूर दक्षिणअंध मतदार - १७३कर्णबधिर मतदार - २१०अस्थिव्यंग मतदार - ९०५इतर व्यंग मतदार - ४८०एकूण - १७६८कोल्हापूर उत्तरअंध मतदार - ४०अस्थिव्यंग मतदार -१९७एकूण - २३७