आॅनलाईन लोकमतनवे पारगाव (जि. कोल्हापूर), दि. ११ : पावसाने ओढ दिल्याने चिंतातुर झालेल्या वाठार (ता. हातकणंगले)ग्रामस्थांनी वेगवेगळे विधि करून पावसासाठी याचना केली. मंगळवारी गावातील सर्व व्यवहार बंद ठेऊन दिवस पाळक ठेवण्यात आला. वाठार येथील परिसरात पाऊस न पडल्याने बळीराजा धास्तावला आहे. रोहिणीत पेरणी झालेल्या पिकांची चांगली उगवण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने उगवुन आलेली पीके धोक्यात आली आहेत. या संदर्भात वाठारच्या जेष्ठ नागरिकांंनी हनुमान मंदीरात बैठक घेऊन पाऊस पडण्यासाठी धार्मिक उपाय योजना करण्याचे ठरवले.पाळक दिन घेण्याचे ठरवले.मंगळवारी गावातील सर्व व्यवहार बंद ठेऊन पाळक पाळण्यात आला. सकाळी धार्मिक विधी नुसार गाढव व गाढवीणीचे लग्न लावून देण्यात आले. गाढव व गाढवीणीची सवाद्य मिरवणूकही काढण्यात आली. यावेळी देवदेवतांची पूजा करुन ग्राम दैवत हनुमान देवाला अभिषेक घालण्यात आला. सर्व ग्रामस्थांनी यावेळी उत्स्फुर्तपणे हजर राहून पावसासाठी याचना केली.
वाठारमध्ये पावसासाठी गाढव-गाढवीणीचे लावले लग्न
By admin | Updated: July 11, 2017 16:03 IST