शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

गोतेवाडी योजना नुसती नावाला, पाणी नाही गावाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:24 IST

श्रीकांत ऱ्हायकर लोकमत न्यूज नेटवर्क धामोड : कोते ...

श्रीकांत ऱ्हायकर

लोकमत न्यूज नेटवर्क

धामोड : कोते गावासह मानेवाडी व गोतेवाडी या गावांना २०१२-१३ च्या दरम्यान एक कोटी रुपयांची पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाली. तेव्हा गावकऱ्यांनी पिण्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो, असे म्हणत सुटकेचा नि:श्वास सोडला; पण ठेकेदाराकडून योग्य पद्धतीने काम पूर्ण न झाले ने तिथेच या योजनेचा फज्जा उडाला. या तीन गावांसाठी मंजूर झालेली एक कोटी रुपयांची ही योजना काही वर्षांतच कुचकामी ठरली. इतके पैसे खर्च करूनही गावकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे.

दुसरीकडे घोटभर पाणी मिळवण्यासाठी महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याने ही पाणी योजना म्हणजे असून अडचण नसून खोळंबा बनली आहे. गेल्या आठ दिवसांपासून तर गावात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे योजना नुसती नावाला, पाणी नाही गावाला म्हणण्याची गत ग्रामस्थांवर आलेली आहे.

कोते ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये कोते गावासह मानेवाडी व गोतेवाडी या गावांचा समावेश होतो. २०१२-१३ साली कोते गावासह मानेवाडी, गोतेवाडी या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जवळपास एक कोटी रुपयांची योजना मंजूर केली गेली.

कधी नव्हे ते गावात नळ जोडले गेले व नळांना पाणीही आले; पण एक कोटी रुपये खर्च करून तयार झालेल्या या योजनेने नागरिकांचा भ्रमनिराश झाला. पाइपलाइनला वारंवार लागणारी गळती, अपुरा पाणीपुरवठा, ज्यादा लाइट बिल आकार व तुलनेत कमी पाणी मिळत असल्याने या योजनेचा पुरता बोजवारा उडाला. गेल्या आठ दिवसांपासून तर गावात भीषण पाणीटंचाई असून पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी महिलांना गावभर वणवण करावी लागत आहे.

पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी या महिलांना गेल्या आठ दिवसांपासून गावाशेजारील कूपनलिका अथवा झऱ्यांचा आश्रय घ्यावा लागत आहे; पण कूपनलिकांची पाणीपातळीही खालावल्याने गावातील एकाच कूपनलिकेवर सकाळी मोठी गर्दी पहावयास मिळते आहे. यावेळी पाणी मिळवताना महिला वर्गात जोरदार भांडणे होताना पाहावयास मिळत आहे.

प्रतिक्रिया

गेल्या आठ दिवसांपासून गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असताना देखील ग्रामपंचायत प्रशासन याकडे गांभीर्याने का बघत नाही. गावचा पाणीप्रश्न कायमचा मिटवण्याची भाषा करणारे आता कुठे आहेत. किमान महिलांची भटकंती थांबवण्यासाठी तरी अशांनी पुढाकार घ्यावा.

- सचिन पाटील (सामाजिक कार्यकर्ते, कोते )

फोटो ओळी= गोतेवाडी (ता. राधानगरी) येथील शेती पंप व कूपनलिकेवरती पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी ग्रामस्थांची होत असलेली गर्दी.