शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकांना समजून घेतल्याने चांगले काम:संजय मोहिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:08 IST

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये लोकांना समजून घेत काम केल्यामुळेच चांगले काम करु शकलो व गुन्ह्यांचेही प्रमाण रोखण्यामध्ये यश मिळाले, अशी भावना मावळते जिल्हा पोलीसप्रमुख संजय मोहिते यांनी व्यक्त केली.नाशिक येथे पदोन्नतीने बदली झालेल्या मोहिते यांचा गुरुवारी ‘लोकमत’ कार्यालयात निरोपादाखल संपादक वसंत भोसले आणि वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि ...

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये लोकांना समजून घेत काम केल्यामुळेच चांगले काम करु शकलो व गुन्ह्यांचेही प्रमाण रोखण्यामध्ये यश मिळाले, अशी भावना मावळते जिल्हा पोलीसप्रमुख संजय मोहिते यांनी व्यक्त केली.नाशिक येथे पदोन्नतीने बदली झालेल्या मोहिते यांचा गुरुवारी ‘लोकमत’ कार्यालयात निरोपादाखल संपादक वसंत भोसले आणि वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. नव्याने येणाºया अधिकाºयाला सर्वत्र सन्मान दिला जातो परंतु ज्यांचे चांगले काम असते, त्यांचा निरोपावेळीही सत्कार होतो हेच कोल्हापूरचे वैशिष्ट्य असल्याचे संपादक भोसले यांनी सांगितले.मोहिते म्हणाले, ‘कोल्हापूर हे जिंदादिल शहर आहे. इथला माणूस समजून घेतला की काम करण्यात अडचण येत नाही. सर्वांना सोबत घेऊनच काम करीत गेल्याने आज कोल्हापूरचा निरोप घेताना अगदी शाहू छत्रपती यांच्यापासून ते ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्यापर्यंत अनेकांनी नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक चळवळीत ज्या कार्यकर्त्यांना खडसावण्याची वेळ आली, तेदेखील माझा हेतू शुद्ध होता; त्यामुळे येऊन भेटून गेले.पोलीस दलात असलेल्या आपल्या वडिलांची कारकिर्द, त्यामुळेच कागदोपत्री आजरा येथे जन्म झाल्याची नोंद, वडिलांमुळे निळू फुले, बाबा कदम, निपाणीचे लेखक महादेव मोरे अशा अनेक साहित्यिक, कलावंतांशी आलेला संपर्क यांची दिलखुलास मांडणी मोहिते यांनी केली. यावेळी उपसरव्यवस्थापक ( वितरण, दक्षिण) संजय पाटील, मुख्य बातमीदार विश्वास पाटील, उपव्यवस्थापक (मनुष्यबळ आणि प्रशासन) संतोष साखरे, उपव्यवस्थापक (इव्हेंट) दीपक मनाठकर आदी उपस्थित होते.इचलकरंजीतगुन्हेगारी वाढलीइचलकरंजीत संघटित गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून, त्यास अनेक कारणे आहेत. ते रोखण्यासाठी पोलिस दलाने विशेष नियोजन केले आहे. तरुण अधिकारी त्याची अंमलबजावणी करत आहेत, असेही मोहिते यांनी सूचित केले.