शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रनगरीला डावलून जिल्ह्यात भलतेच राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:16 IST

इचलकरंजी : वस्त्रनगरीला डावलून जिल्ह्यात भलतेच राजकारण सुरू आहे. जिल्ह्यातील मंत्री काहीही म्हणू देत, माझी काळजी इतरांनी करू नये. ...

इचलकरंजी : वस्त्रनगरीला डावलून जिल्ह्यात भलतेच राजकारण सुरू आहे. जिल्ह्यातील मंत्री काहीही म्हणू देत, माझी काळजी इतरांनी करू नये. त्यासाठी मी सक्षम आहे. यांच्या श्रेयवादामुळे वस्त्रोद्योगाला भेडसावणारे प्रश्‍न बाजूला पडत चालले आहे. वस्त्रनगरीला आवश्यक ते सर्वकाही करण्यास मी खंबीर आहे. जनता माझ्या पाठीशी असून कोण कशासाठी काय करत आहे, याची सर्व कल्पना जनतेला आहे, असा टोला आमदार प्रकाश आवाडे यांनी लगावला.

छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ताराराणी पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमामध्ये आमदार आवाडे बोलत होते. शहराला शुद्ध व मुबलक पाणी मिळण्यासाठी दूधगंगा योजना पूर्ण करायची आहे. वस्त्रोद्योगास ५ टक्के व्याज अनुदान, वीज सवलत, रेशन व्यवस्था मिळण्यासाठी लढा देणार आहे. कोणत्याही परिस्थितीत पुढच्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज याच्या जयंतीदिनी संभाजी चौकात महाराजांचा पुतळा बसविला जाईल. प्रत्येक अन्यायाच्या विरोधात कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे आणि जोमाने कामाला लागावे, असा आदेशच आमदार आवाडे यांनी दिला.

शहरातील काही नेतेमंडळींमध्ये कोणाच्या कोंबड्याच्या आरवण्याने सूर्य उगवतोय काय हे बघण्यासाठी चढाओढ सुरू आहे. पक्षीय कार्यकर्त्यांना बोलवून कार्यक्रम घ्यायचे आणि यातून प्रश्‍न सुटलाच तर आम्हीच केलं हे दाखवण्याचा प्रकार या राजकीय पक्षाच्या मंडळींचा सुरू आहे. इचलकरंजी नगरपालिकेच्या आगामी निवडणूक ताराराणी पक्षातर्फे स्वबळावरच लढवायची आहे. याबाबत कोणाशीही चर्चा व आघाडी करायची नाही.

दरम्यान, १ जुलै रोजी ताराराणी पक्षाची कार्यकारिणी घोषित करण्यात येणार आहे. सध्या शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असून तो रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विशेषत : गावभाग, कलावंत गल्ली, तांबेमाळ, जवाहरनगर, शहापूर भागात बाधितांची संख्या जास्त आहे. त्या भागातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कोरोनाला थोपवून शहर कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करावा. आयजीएम हॉस्पिटलमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असून त्या मिळवून देणार असल्याचेही आमदार आवाडे यांनी सांगितले.