शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

(गुड न्यूज) : शिवाजी विद्यापीठाकडून ३० प्राध्यापकांना पदोन्नतीद्वारे ‘नववर्षाची भेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:24 IST

काही तांत्रिक कारणांमुळे या पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण रखडली होती. त्याचा परिणाम या प्राध्यापकांच्या मानसिकतेवर होता होता. ते एकप्रकारे विद्यार्थी ...

काही तांत्रिक कारणांमुळे या पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण रखडली होती. त्याचा परिणाम या प्राध्यापकांच्या मानसिकतेवर होता होता. ते एकप्रकारे विद्यार्थी आणि विद्यापीठ विकासाला मारक ठरत होते. ते लक्षात घेऊन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या सूचनेनुसार विद्यापीठ प्रशासनाने रखडलेल्या पदोन्नतीची कार्यवाही लवकर पू्र्ण करण्याची कार्यवाही केली. त्यामुळे विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभाग, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट, राज्यशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागांतील ३० प्राध्यापकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या पदोन्नतीची पत्रे या प्राध्यापकांना विद्यापीठाकडून नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात दिली जाणार आहेत.

चौकट

नववर्षात पदोन्नतीचे वेळापत्रक ठरविणार

दिवाळीपूर्वी ‘कॅस’अंतर्गत ३६ प्राध्यापकांना पदोन्नती दिली होती. आता नववर्षाच्या पहिल्या दिवशी ३० जणांना दिली जाणार असल्याचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सांगितले. सर्व पात्र प्राध्यापकांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने पदोन्नती वेळेवर मिळणे आवश्यक आहे. पदोन्नतीमुळे काम करण्यातील हुरूप वाढतो. ज्या-त्या वर्षी पदोन्नती मिळणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या पदोन्नतीचे वेळापत्रक नववर्षात विद्यापीठ प्रशासनाकडून ठरविण्यात येईल. त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.

चौकट

पदोन्नतीची प्रक्रिया

साहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्यांना पुढे सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ प्राध्यापक अशी पदोन्नती ‘कॅस’अंतर्गत दिली जाते. त्यासाठीची शैक्षणिक पात्रता, अर्हता पूर्ण केलेल्या प्राध्यापकांनी विद्यापीठ प्रशासनाकडे अर्ज करणे आवश्यक असते. अर्ज केल्यानंतर प्रशासनाकडून त्याची छाननी केली जाते. त्यानंतर काही प्रकरणांमध्ये कागदपत्रांची पडताळणी करून, काही प्रकरणांमध्ये मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण करून पदोन्नती देण्याची कार्यवाही होते.

आकडेवारी दृष्टिक्षेपात

प्राध्यापकांची मंजूर पदे : २६२

कार्यरत पदे : १३९

रिक्त पदे : १३०