कोल्हापूर: सुदृढ आणि स्वस्थ बाळांचे कौतुक करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे जॉन्सन्स बेबी व इंडियन अकॅडमी आॅफ पेडिअॅट्रिक्सच्या सहकार्याने मंगळवारी (दि. १४) सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बाळाचे आरोग्य आणि पालनपोषणासंदर्भात जागरूकता वाढविण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. गुटगुटीत बाळाच्या चेहऱ्यावरील हास्यापेक्षा आईवडिलांना अधिक मौल्यवान काय असू शकते? परंतु या नाजूक जिवाची काळजी घेणे हे फार जिकिरीचे काम असते. एक शतकापासून ‘जॉन्सन्स बेबी’च्या सर्व उत्पादनांना लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मातांची आणि तज्ज्ञ डॉक्टरांची पहिली पसंती राहिली आहेत. वैद्यकीय परीक्षणांतून सिद्ध झालेली ‘जॉन्सन्स बेबी’ची सर्व उत्पादने बाळाच्या अत्यंत नाजूक त्वचेला सहन होतील, अशीच तयार केली जातात. लहान बाळाचे डोळे, त्वचा आणि केस यांच्या गरजांकडे विशेष लक्ष देऊन सुरक्षित, सौम्य आणि परिणामकारक अशी तिहेरी लाभयुक्त (जॉन्सन्स बेबी ट्रिपल बेबी प्रोटेक्शन) उत्पादने पालकांचा विश्वास टिकवून आहेत. बाळाच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून पालकांनी त्याला सर्व संकटांपासून वाचविण्याचे वचन दिलेले असते. त्या वचनपूर्ततेसाठी ‘जॉन्सन्स’ सर्वश्रेष्ठ उत्पादनांसह सदैव तत्पर आहे. इंडियन अकॅडमी आॅफ पेडिअॅट्रिक्स (आयएपी) कोल्हापूर ही मुलांच्या आरोग्य विकासासाठी कार्य करणारी भारतातील बालचिकित्सकांची सर्वांत मोठी संस्था आहे. ‘लोकमत सुदृढ बालक स्पर्धे’त पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयएपी, कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षा डॉ. छाया पुरोहित यांनी केले आहे. या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कॉलेज आॅफ नर्सिंग व दी ट्री हाऊस प्ले ग्रुप अॅँड नर्सरी यांचे सहकार्य लाभले आहे.ही स्पर्धा ० ते १, १ ते ३ वर्षे आणि ३ ते ५ वर्षे अशा तीन गटांत होणार आहे. प्रत्येक गटातील स्पर्धकांना बक्षीस जिंकण्याची संधी आहे. सर्व स्पर्धकांनी बाळाचे बर्थ सर्टिर्फिकेट, वयाचा पुरावा आणि वैद्यकीय उपचार व लसीकरणाची कागदपत्रे नावनोंदणी करतेवेळी सादर करणे गरजेचे आहे. हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसूदन हॉलमध्ये दुपारी दोन वाजता ही स्पर्धा पार पडणार असून, नावनोंदणीसाठी लोकमत शहर कार्यालय, पूर्णिमा अपार्टमेंट, दुसरा मजला, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी व ९७६७२६४८८५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
‘लोकमत’तर्फे सुदृढ बालक स्पर्धा
By admin | Updated: July 10, 2015 00:08 IST