शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

‘अच्छे दिन’ ‘बुरे’ करणाऱ्यांचा बुरखा फाडा

By admin | Updated: May 29, 2015 00:01 IST

कल्लाप्पाण्णा आवाडे : इचलकरंजीत काँग्रेसकडून मोदी सरकारचा निषेध

इचलकरंजी : केंद्रातील सत्तेची वर्षपूर्ती साजरी करणाऱ्या मोदी सरकारने दिलेल्या सर्वच आश्वासनांना हरताळ फासला आहे. केलेल्या सगळ्या वल्गना हवेतच विरल्या आहेत. म्हणूनच विकासापेक्षा परदेश वाऱ्यावर भर देणाऱ्या अन् ‘अच्छे दिन’ला ‘बुरे’ बनविणाऱ्या मोदी सरकारचा बुरखा फाडून त्यांचे खरे रूप कार्यकर्त्यांनी जनतेला दाखवून द्यावे, असे आवाहन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी केले.केंद्रातील भाजप सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला असून, भाजप आणि मोदींनी जनतेला भुरळ पाडणारी ‘अच्छे दिन’ची दिलेली वचने पाळली नाहीत. अच्छे दिनची ‘पहिली पुण्यतिथी’ म्हणून प्रतीकात्मक निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. शहर कॉँग्रेस समितीच्यावतीने जनतेचा वचनभंग करणाऱ्या मोदी सरकारचा प्रतीकात्मक निषेध करण्यात आला. त्याप्रसंगी आवाडे बोलत होते.सुरुवातीला शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी प्रदेश कॉँग्रेस समितीच्यावतीने देण्यात आलेल्या कार्यक्रमाचा आढावा सादर केला. नगरसेवक शशांक बावचकर यांनी, भाजपने कॉँग्रेसबद्दल गैरसमज पसरविण्यात यश मिळविले आहे, न पाळता येणारी आश्वासने दिली व जनतेची फसवणूक केली असल्याचे सांगितले.याप्रसंगी शहर कॉँग्रेसचे उपाध्यक्ष विलास गाताडे, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, शामराव कुलकर्णी, अशोकराव सौंदत्तीकर, बाळासाहेब कलागते, शेखर शहा, तौफिक मुजावर, राहुल खंजिरे, महावीर कुरुंदवाडे, सुजाता भोंगाळे, रत्नप्रभा भागवत, नजमा शेख, आदींसह कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)