इचलकरंजी : येथील गोविंदराव ज्युनिअर कॉलेजचा खेळाडू ओंकार राजेंद्र पन्हाळकर याला सुवर्णपदक प्राप्त झाले. त्याने गुवाहाटी (आसाम) येथे ज्युनिअर राष्टीय मैदानी स्पर्धेत भारतात पाचवा, तर रायपूर (छत्तीसगड) येथे पश्चिम विभागीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले.
ओंकार हा सध्या इयत्ता बारावी आर्टस्मध्ये शिकत आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बोहरा व अध्यक्ष हरिश बोहरा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार केला. यावेळी उदय लोखंडे, बाबासाहेब वडिंगे, मुख्याध्यापक एन. एम. घोडके, उपमुख्याध्यापक एस. एस. चिंचवाडे, आर. जे. झपाटे, एन. एस. पाटील, एस. एस. तेली, महादेव पाटील आदी उपस्थित होते. ओंकार यास त्याचे वडील राजेंद्र व ज्युनिअर कॉलेजचे क्रीडाप्रमुख प्रा. अमित कागले यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळी
२६०३२०२१-आयसीएच-०२
गोविंदराव ज्युनिअर कॉलेजचा खेळाडू ओंकार राजेंद्र पन्हाळकर याने सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल हरिश बोहरा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार केला.