शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सोने-चांदी खरेदीत घट; सराफ उद्योगाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:06 IST

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘एक देश-एक कर’ या उद्देशाने केंद्र सरकारने लागू केलेल्या जीएसटीमुळे सोने-चांदीच्या खरेदी-विक्रीत घट झाली आहे. जीएसटीमुळे चोख सोन्यासह दागिन्यांवर दोन टक्क्यांनी वाढीव कर लागल्याने त्याचा फटका सराफ उद्योगाला बसला आहे. दुसरीकडे, एका वर्षानंतरही ग्राहकांच्या मनात कराबद्दल संभ्रम आहे.जीएसटी लागू होण्यापूर्वी सोन्या-चांदीवर १.२ टक्के व्हॅट ...

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘एक देश-एक कर’ या उद्देशाने केंद्र सरकारने लागू केलेल्या जीएसटीमुळे सोने-चांदीच्या खरेदी-विक्रीत घट झाली आहे. जीएसटीमुळे चोख सोन्यासह दागिन्यांवर दोन टक्क्यांनी वाढीव कर लागल्याने त्याचा फटका सराफ उद्योगाला बसला आहे. दुसरीकडे, एका वर्षानंतरही ग्राहकांच्या मनात कराबद्दल संभ्रम आहे.जीएसटी लागू होण्यापूर्वी सोन्या-चांदीवर १.२ टक्के व्हॅट आकारला जात होता शिवाय जुने दागिने देऊन नवे दागिने बनविल्यानंतर त्यावर कोणताही कर आकारला जात नव्हता. मात्र, गतवर्षी केंद्राने सोन्या-चांदीवर तीन टक्के जीएसटी लावल्यानंतर आपसूकच सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत. या करापोटी ग्राहकांना जास्तीच्या १.८ म्हणजे जवळपास दोन टक्क्यांनी वाढीव कर भरावा लागत आहे.पूर्वी ग्राहकाने आपल्याकडील जुने सोने देऊन, नवा दागिना बनवून घेण्यावर कोणताही कर आकारला जात नव्हता. आता मात्र अशा दागिन्यांच्या मजुरीवर १८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. शिवाय नव्या दागिन्यांवरही कर आकारला जातो. त्यामुळे दागिने घडवून घेणे ही बाबदेखील खर्चिक झाली आहे. आजही अनेक लोक गुंतवणूक किंवा भविष्यात वाढीव परतावा देणारी वस्तू म्हणून चोख सोन्याची खरेदी करतात. मात्र या गुंतवणुकीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत असल्याने तोही एक फटका बसला आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून सोन्या-चांदीच्या खरेदी-विक्रीत घट झाली आहे.हे सगळे खरे असले तरी सुवर्णालंकार हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे सोन्या-चांदीचे दर वाढल्याचा परिणाम काही दिवस बाजारपेठेवर जाणवतो आणि पुन्हा तो सुरळीत होतो. आता कोणत्याही वस्तूच्या खरेदीवर आपल्याला जीएसटी द्यावा लागणार, हे ग्राहकांनीही स्वीकारले आहे; पण अजूनही या व्यवसायावरील जीएसटीबाबत ग्राहकांमध्ये काही प्रमाणात संभ्रम आहे. जीएसटी लागू होऊन वर्ष झाल्यानंतरही हीच स्थिती कायम असल्याने ग्राहकांकडूनही सावधगिरीने सोन्या-चांदीची खरेदी केली जात आहे.छोट्या व्यावसायिकांचा कसया सगळ्या बदलांमध्ये पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करीत असलेल्या सराफ व्यावसायिकांचा कस लागत आहे. मोठे अथवा ब्रॅँडेड ज्वेलर्स जीएसटीच्या नियमांनुसार सॉफ्टवेअर, दागिन्यांच्या नोंदी, आॅडिट, अकौंटिंग या सगळ्या नोंदी चोखपणे ठेवू शकतात. मात्र, लहान व्यावसायिकांच्या दृष्टीने हे जिकीरीचे आहे. ग्राहकांची आवड, या क्षेत्रातील आधुनिक बदल, नवनवीन तंत्रज्ञान आणि स्पर्धेत लहान सराफ व्यावसायिक टिकण्याचे खरे आव्हान आहे.