शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’चे दूध संकलन आज बंद

By admin | Updated: June 5, 2017 01:14 IST

‘गोकुळ’चे दूध संकलन आज बंद

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा, या मागणीसाठी सोमवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र आणि कोल्हापूर बंदला दूध संकलन सकाळी व सायंकाळी बंद ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष विश्वास नारायण पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी रविवारी रात्री जाहीर केला. या निर्णयामुळे ‘गोकुळ’चे आजचे संकलन ठप्प होणार असले तरी कोल्हापूर शहरातील दूध वितरणावर मात्र फारसा परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या संपात पहिल्याच दिवशी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी दूध संघाने संकलन बंद ठेवून पाठिंबा दिला होता. गोकुळ हा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मालकीचा संघ आहे आणि शेतकरी बांधव संपात उतरले असल्याने ‘गोकुळ’नेही या संपाला संकलन बंद ठेवून जाहीर पाठिंबा द्यावा, अशी मागणी विविध शेतकरी नेत्यांकडून झाली होती. त्याशिवाय अनेक गावांनी उत्स्फूर्तपणे संकलन बंद ठेवून संपाला पाठिंबा दिला होता. त्याचा परिणाम म्हणून ‘गोकुळ’चे लाख, सव्वा लाख लिटर दूध संकलन कमी झाले होते. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेत संप मागे घेण्यात आल्याची घोषणा झाली; परंतु त्याबाबत शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटली. त्यामुळे आजच्या बंदला शेतकऱ्यांतूनच जोरदार पाठिंबा मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्याचा परिणाम म्हणून रविवारी दिवसभर ‘गोकुळ’ने संकलन बंद ठेवून संपाला पाठिंबा द्यावा, असा दबाव सोशल मीडिया व चर्चेतूनही वाढला. त्याची दखल घेऊन संघाने संकलन बंद ठेवून संपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.उद्या वितरणावर परिणाम शक्य‘गोकुळ’चे सध्या प्रतिदिन नऊ लाख लिटर संकलन होते. ते आज होणार नाही. परंतु, आज कोल्हापूर शहरातील दूध वितरणावर मात्र याचा परिणाम होणार नाही. सोमवारचे संकलन बंद राहिल्याने कोल्हापूरसह पुणे, मुंबईच्या दूध वितरणावर मात्र मंगळवारी परिणाम होईल. मुंबईला प्रतिदिन सात लाख लिटर, तर पुण्याला पावणेदोन लाख लिटर दूध पुरवठा होतो.