शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

‘गोकुळ’ने गायीच्या दुधाला २७ रुपये दर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 23:41 IST

कोपार्डे : अतिरिक्त ऊस झाला तरी कुंभी-कासारी कारखान्याने तो गाळप करण्यासाठी नाकारला नाही. साखरेचे दर घसरले म्हणून शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर दिलाच; पण अतिरिक्त दूध झाले व दूध दर कमी झाले म्हणून ते स्वीकारणार नसल्याचे जाहीर करणाºया गोकुळ दूध संघाचा एक संचालक कुंभी कारखान्यावर चुकीचे आरोप करत आहे. हिंमत असेल तर ...

कोपार्डे : अतिरिक्त ऊस झाला तरी कुंभी-कासारी कारखान्याने तो गाळप करण्यासाठी नाकारला नाही. साखरेचे दर घसरले म्हणून शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर दिलाच; पण अतिरिक्त दूध झाले व दूध दर कमी झाले म्हणून ते स्वीकारणार नसल्याचे जाहीर करणाºया गोकुळ दूध संघाचा एक संचालक कुंभी कारखान्यावर चुकीचे आरोप करत आहे. हिंमत असेल तर दुधाला शासनाने जाहीर केलेला २७ रुपये दर द्यावा, असे आव्हान देत आमदार चंद्रदीप नरके यांनी ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांंचे नाव न घेता टीका केला.कोपार्डे (ता. करवीर) येथे झालेल्या कुंभी-कासारी संचालक मंडळ संपर्कदौºयात आ. नरके बोलत होते. अध्यक्षस्थानी तंटामुक्त संघटनेचे अध्यक्ष भिवा पाटील होते.आमदार नरके म्हणाले, विरोधकांची सन २००० ते २००४ या काळात कारखान्यावर सत्ता होती या काळात पाच अध्यक्ष व त्यांनी केलेला कारभार आजही सभासद विसरलेले नाहीत. एकवेळ तर केवळ १८ रुपयांचा हप्ता काढून चेष्टा केली. आम्ही साखरेचे दर एफआरपीपेक्षा ५०० रुपये कमी असताना एक महिना गाळप झालेल्या उसाचे एकरकमी तर उरलेल्या उसाची दोन हप्त्यात एफआरपी भागवली पण शिक्षण संस्थांच्या आडून ‘गोकुळ’चे संचालक नेत्यांच्या खुशालीसाठी ‘कुंभी’वर आरोप करत बदनामी करत आहेत.शासनाने गायीचा २७ रुपये प्रति लिटर दर जाहीर केला असताना तो २३ रुपये दिला जातोय. म्हैस दूध ३५ रुपयाने खरेदी करून ५४ रुपयाने विकता. मग खरेदी व विक्रीतील २० ते २२ रुपये कुणाच्या खिशात जातात, असा थेट सवाल केला.पी. एन. पाटील यांचे नाव न घेता ते म्हणाले, ज्यांचे नेतृत्व मानता त्या नेत्याकडे असलेल्या भोगावती कारखान्यावर एफआरपी थकली म्हणून जप्तीची नोटीस काढली, त्या कारखान्यावर बोला.यावेळी संचालक निवास वातकर यांनी ‘गोकुळ’मध्ये सीमाभागात १७ रुपये दराने दूध मिळतय म्हणून जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे दूध नाकारले जात आहे. दूध उत्पादन खर्चात वाढ झाली असताना पाच रुपये दर कमी करून शेतकºयांना ठकवले जात आहे. आता ‘गोकुळ’वर घामाच्या दामासाठी फावडी मोर्चा काढणार असून आमदारकी मिळविण्यासाठी नरके घरण्याची बदनामी खपवून घेणार नाही, असा दम ही दिला. प्रास्ताविक संचालक विलास पाटील यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष अ‍ॅड. बाजीराव शेलार, सर्व संचालक, व्ही. जी. पाटील, पोलीस पाटील जालिंदर जामदार, बाजीराव पाटील उपस्थित होते. आभार प्रा. ए. डी. पाटील यांनी मानले.अरूण नरके, चुयेकरांना ‘गोकुळ’मध्ये किंमत नाहीदूध दराचा विषय काढला की तुमच्या काकांना विचारा म्हणणाºया कारभाºयांनी ज्यांनी ‘गोकुळ’ला देशपातळीवर पोहोचवले त्या अरुण नरके व चुयेकरांना किंमत दिली जाते काय. एकवेळ अरुण नरकेंचा सल्ला घ्या मग शेतकºयांचे भले होईल, असा टोला पी एन. व महाडिक यांचे नाव न घेता हाणला.मौनी महाराज नेतेआपले सहकारात हात बरबटलेले असून एकही संस्था सुस्थितीत नसणाºया मौनी महाराज व्रत घेणाºया नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना योग्य तो सल्ला द्यावा, अशी खिल्ली पी. एन. पाटील नाव न घेता उडवली.हिंमत असेल तर ‘गोकुळ’ने २७ रुपये दर द्यावाजशी उसाला एफआरपी मागताय ती आम्ही दिली. आता दुधाची २७ रुपये शासनाची एफआरपी ‘गोकुळ’ने द्यावी, असे आव्हान दिले.