शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

गोकुळ शिरगावची स्मशानभूमी गायब

By admin | Updated: October 6, 2015 00:40 IST

जागेचा वाद पेटला: उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची ग्रामस्थांवर वेळ

कोल्हापूर : ऐतिहासिक श्रीकृष्ण मंदिर, औद्योगिक वसाहतीमुळे देशाच्या नकाशावर पोहोचलेल्या, महसुली उत्पन्नात जिल्'ात द्वितीय स्थानी असलेल्या गोकुळ शिरगावची स्मशानभूमीच गायब झाली आहे. पाडण्यात आलेले जुने स्मशानशेड आणि अर्धवट अवस्थेतील नव्या स्मशानशेडच्या बांधकामामुळे ग्रामस्थांना सध्या उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. गावाच्या लोकसंख्या वाढीनुसार गुरुवारपर्यंत (दि. १) अस्तित्वात असलेल्या स्मशानशेडची ३५ वर्षांपूर्वी उभारणी केल्याचे समजते. या बांधकामावेळी राष्ट्रीय महामार्ग दुपदरी होता. पर्यायाने स्मशानशेडसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होती. मात्र, महामार्ग चौपदरीकरणावेळी सध्याची अस्तित्वात असलेल्या स्मशानशेडची काही जागा शासनाने संपादित केली. परिणामी, स्मशानशेडमध्ये अंत्यसंस्कार व इतर विधी करण्यास जागा अपुरी पडत होती. त्यावर ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावठाणातील लोकांसाठी सध्याच्या स्मशानभूमीचे विस्तारीकरण करून चित्रनगरी परिसरातील गायरान जमिनीकडे नवी स्मशानभूमी उभारण्यासाठी ग्रामपंचायतीकडून निधीची उपलब्धता करण्यात आली. त्यानुसार करवीर निवासिनी देवस्थानच्या पोटखराब १३ गुंठे जागेत ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या स्मशानभूमी विस्तारीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामावर या परिसरातील नागरिकांनी आक्षेप घेतला. शिवाय करवीर पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे तक्रार केली. मात्र, ग्रामपंचायतीने संबंधित स्मशानशेडचे काम सुरू ठेवले. यावर येथील बाळासो चव्हाण यांनी न्यायालयात दावा दाखल करून संबंधित कामाला तात्पुरती मनाई मिळविली. या वादातच सध्या अस्तित्वात असलेले स्मशानभूमीवरील पत्राशेड व बांधकाम अज्ञातांकडून पाडण्यात आले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपूर्वी एका महिलेच्या पार्थिवावर नव्या स्मशानभूमीच्या वादग्रस्त जागा व बांधकामासमोर अंत्यसंस्कार करण्यात आले. सार्वजनिक प्रश्नांवर वाद टाळून सर्वसामंजस्याने मार्ग काढून हा प्रश्न तातडीने सोडविणे गरजेचे आहे. ही जबाबदारी जशी ग्रामपंचायतीची आहे, तसेच गावातील नेतेमंडळी आणि ग्रामस्थांची आहे. अन्यथा उद्या एखादा मृतदेह ग्रामपंचायतीच्या दारात अंत्यविधीसाठी आल्यास आश्चर्य वाटायला नको. (प्रतिनिधी)असा झाला स्मशानशेडचा प्रवासगावातील ३५ वर्षांपूर्वीची परंपरागत स्मशानभूमी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ओढ्यानजीकच्या खासगी पडीक जागेत आहे. गुरुवारपर्यंत सदर स्मशानशेडचा वापर सुरू होता. ही स्मशानभूमी अस्तित्वात येण्यापूर्वी सध्या वादग्रस्त असलेल्या नव्या स्मशानशेडच्या बांधकामाशेजारी ओढापात्राजवळ काही पार्थिवांवर अंत्यसंस्कार केले जात होते. यापूर्वी गावातील ‘पाणोता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओढ्याजवळील जागेत अंत्यसंस्कार केले जात होते. काही ग्रामस्थांच्या स्वत:च्या शेतीत अथवा सरकारी पडजागेत मृतदेहांचे दहन अथवा दफन करण्यात येत होते.गेल्या तीन दिवसांपूर्वी अस्तित्वात असलेले स्मशानशेड खासगी जागेत होते. वर्षाकाठी गावातील मृत्यूचे प्रमाण सरासरी ५० ते ६० इतके आहे. संबंधित स्मशानशेड एकापेक्षा अधिक मृतदेहांच्या अंत्यसंस्काराला अपुरी पडत होते. त्यावर ग्रामस्थांनी ग्रामसभेद्वारे स्मशानभूमीच्या दक्षिण-उत्तर परंपरागत जागेत सुशोभीकरण व विस्ताराची मागणी केली. त्यानुसार ग्रामपंचायतीने बांधकाम सुरू केले. या ठिकाणी मृतदेहांच्या दहनानंतर त्याचा कोणालाही त्रास होणार नाही, अशी दक्षता घेतली जाणार आहे. या बांधकामासाठी आवश्यक त्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत.- एकनाथ सूर्यवंशी, ग्रामसेवकवाद कायमगावात नेतेमंडळींची संख्या कमी नाही. मात्र, त्यांच्याकडून स्मशानभूमीसारख्या प्रश्नावर कधी गंभीर भूमिका घेतलेली नाही. त्यांच्या राजकारणामुळे आज स्मशानभूमी गायब होण्याचा प्रकार घडला आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि विद्यमान आमदार अमल महाडिक यांनी हा प्रश्न सामंजस्याने सोडविण्याची सूचना यापूर्वीही ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या आहेत.वादाचा मुद्दा असा...जुन्या स्मशानशेडच्या दुरुस्तीऐवजी, ग्रामपंचायतीकडून निधीचा दुरुपयोग करून सध्या उभारण्यात येत असलेल्या नव्या स्मशानशेडमुळे नागरिकांना प्रदूषणास सामोरे जावे लागणार आहे. मात्र, सध्या अस्तित्वात असलेले स्मशानशेड अपुरी पडत असल्याने नव्या जागेत प्रशस्त स्मशानशेड उभे करून नागरिकांची गैरसोय टाळली जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी नवे स्मशानशेड उभारावे, अशी बहुतांश ग्रामस्थांची मागणी असल्याने ग्रामपंचायत आपल्या भूमिकेवर ठाम आहे. या दोन्ही मुद्द्यांवरून स्मशानशेडचा वाद पेटला आहे. गावातील आघाड्यांच्या राजकारणामुळे स्मशानशेड दुरुस्तीचा प्रश्न कायम प्रलंबित राहिला असून, सध्या उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची लाजिरवाणी वेळ ग्रामस्थांवर आली आहे. केवळ जमिनीचे वाढते भाव आणि नवीन स्मशानभूमीमुळे जागांचे दर पडण्याची भीती हाच स्मशानभूमी गायब होण्यामागील कळीचा मुद्दा असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले.