शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील जागाच ‘गोकुळ’ दुधाच्या घुसळणीचे कारण -‘गोकुळ’ अध्यक्ष पदाचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 01:22 IST

गेले अनेक वर्षे गुण्यागोविंदाने ‘गोकुळ’मध्ये रमणाऱ्या संचालकांमध्ये एकदम असंतोष कसा उफाळून आला? हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. अध्यक्ष विश्वास पाटील यांचा राजीनामा लांबण्यामागे मुंबईतील जागा

ठळक मुद्दे १७० कोटींची जागा खरेदी करणार, आपल्याच कालावधीत होण्यासाठी प्रयत्न

कोल्हापूर : गेले अनेक वर्षे गुण्यागोविंदाने ‘गोकुळ’मध्ये रमणाऱ्या संचालकांमध्ये एकदम असंतोष कसा उफाळून आला? हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. अध्यक्ष विश्वास पाटील यांचा राजीनामा लांबण्यामागे मुंबईतील जागा खरेदीचे कारण असल्याचे बोलले जात आहे. वाशी येथे दूध प्रकल्प व पॅकिंग सेंटरसाठी चौदा एकर जागा १७० कोटीला खरेदी केली जाणार असून, हा व्यवहार आपल्याच कालावधीत व्हावा, यासाठी पाटील यांच्यासह काही संचालकांचा प्रयत्न आहे.

‘गोकुळ’ हे जिल्ह्याच्या राजकारणाचे सत्ता केंद्र असल्याने येथील वर्चस्वाला महत्त्व आहेच; पण त्याच्या पोटात दुसरी अनेक कारणे दडली आहेत. संघाचे नेतृत्व जरी महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील हे करीत असले तरी यामध्ये प्रत्येक तालुक्यातील नेते सहभागी आहेत. गेले अनेक वर्षे या दोन नेत्यांची सत्ता आहे. रोटेशननुसार दर दोन वर्षांनी अध्यक्ष बदल यासह इतर बाबतीतही नेत्यांची एकवाक्यता राहिली. त्यामुळे ‘गोकुळ’च्या दुधात अंतर्गत कितीही घुसळण झाली तर ती बाहेर येत नव्हती. यावेळेला अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून संचालकांत धुसफूस सुरू झाली, राजीनामा देत नाही असे झाल्यानंतर धुसफुसीचे अंतर्गत वादात रूपांतर झाले आणि सगळे प्रकरण बाहेर पडले. साडेतीन वर्षे झाल्याने विश्वास पाटील यांनी राजीनामा द्यावा, असा आग्रह ज्येष्ठ संचालकांचा आहे. पाटीलही राजीनामा देण्यास तयार आहेत; पण मुंबईतील जागेचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर देऊ, असा त्यांचा सुरुवातीपासूनच ठेका होता. त्याला संचालकांचा विशेषत: ज्येष्ठ संचालकांचा आक्षेप राहिला आणि त्यांनी मागील बैठकीला विषयच हाणून पाडल्यानंतर प्रकरणाने वेगळे वळण घेतले.विश्वासात न घेताच जागा खरेदीचा प्रयत्नसंघात कोणताही निर्णय घेताना सर्व संचालकांना विश्वासात घेऊनच तो मंजूर केला जातो. पण, मुंबईतील जागा खरेदीत संचालकांना विचारले नसल्याचा आरोप होत आहे. अध्यक्ष पाटील यांनी परस्पर बोलणी करून थेट संचालक मंडळापुढे मंजुरीसाठी ठेवल्याने संचालक संतप्त झाले.पेल्यातीलच वादळ ठरणार?महाडिक व पी. एन. पाटील या दोघांना एकमेकापासून दूर करण्याचा प्रयत्न झाला, पण किमान ‘गोकुळ’च्या सत्तेपुरते का असेना एकसंध राहिले. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत तर महाडिक व पाटील एकमेकांच्या विरोधात होते, त्यानंतर दोघांमध्ये वितुष्ट निर्माण होईल, असा विरोधकांचा अंदाज होता. ‘गोकुळ’ दुधाच्या ताकदीने दोघांना पुन्हा घट्ट बांधले. आता अध्यक्ष निवडीवरून दोन गट पडले असले तरी हे पेल्यातीलच वादळ ठरणार हे मात्र निश्चित आहे.मंगळवारी राजीनामा शक्यजागा खरेदीचे प्रकरण चिघळल्याने आता राजीनामा लांबविला जाणार नाही. मंगळवारी (दि. १) अध्यक्ष पाटील राजीनामा कार्यकारी संचालकांकडे देण्याची शक्यता असून, तो शुक्रवार (दि. ४)च्या बैठकीला ठेवून मंजूर केला जाईल.