शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळ खासगी मालकांच्या घशात जाऊ द्यायचा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क : बांबवडे : गोकुळ दूध संघ सभासदांच्या, शेतकऱ्यांच्या मालकीचा संघ आहे. तो खासगी मालकांच्या घशात ...

लोकमत न्यूज नेटवर्क :

बांबवडे : गोकुळ दूध संघ सभासदांच्या, शेतकऱ्यांच्या मालकीचा संघ आहे. तो खासगी मालकांच्या घशात जाऊ द्यायचा नाही या इराद्यानेच या निवडणुकीला सामोरे जात असून, गोकुळमध्ये आता सत्तांतर अटळ आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

बांबवडे तालुका शाहूवाडी येथे गोकुळ ठरावधारकांच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्‍वास नारायण पाटील होते. यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले की, गेल्या निवडणुकीची व आताची परिस्थिती वेगळी आहे. गेल्या निवडणुकीपासून आतापर्यंत संघाच्या हितासाठी नेहमी संघर्षाची भूमिका घेत आलो आहे. आम्ही त्यांचे मल्टिस्टेट करण्याचे मनसुबे उधळून लावले. त्याचे फळ आता मिळणार आहे. माननीय मुश्रीफ साहेब व आम्ही सत्ताधाऱ्यांचे सर्व मनसुबे यावेळी उधळून लावू व सत्तांतर घडवून आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विश्वास पाटील म्हणाले की, शाहूवाडी तालुक्यातील गोगवे शीतकरण केंद्र उभारण्यात माजी आमदार संजीवनी गायकवाड व आनंदराव पाटील यांचे योगदान मोठे आहे. तुमच्या तालुक्यातील उमेदवार कर्णसिंह गायकवाड यांच्या पाठीशी राहावे व आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आमदार विनय कोरे म्हणाले की, माझी भूमिका ही नेहमी तत्त्वाची आहे. आतापर्यंत सत्ताधारी गट चुकीच्या भूमिकेतून संघ चालवीत होता म्हणून आम्ही त्यांना विरोध केला. शाहूवाडी तालुक्यात गोकुळची ताकद विरोधकांनी राजकीय हितासाठी वापरली आहे. संजयसिंह गायकवाड यांनी तालुक्यासाठी केलेल्या कार्याची पोचपावती कर्णसिंह गायकवाड यांना निश्‍चितपणे मिळणार आहे. तरी आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदान करून सर्व पॅनलच्या विजयासाठी जिवाचे रान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कर्णसिंह गायकवाड म्हणाले की, शाहूवाडी तालुक्यात मतदारांची संख्या चांगल्या प्रकारे असून, जास्तीत जास्त मतदार हे आघाडीच्या पाठीशी राहतील अशी ग्वाही मी देतो.

यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी बांधकाम व अर्थ सभापती सर्जेराव पाटील, गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, नावेद मुश्रीफ, वीरेंद्र मंडलिक, अजित नरके, अमरसिंह पाटील, योगीराज गायकवाड, प्रकाश पाटील, अभिजित तायशेटे, एस. आर. पाटील, बाबासो चौगुले, आदी उपस्थित होते.

माजी सभापती पंडितराव नलवडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर उपसभापती महादेवराव पाटील यांनी आभार मानले.

फोटो : बांबवडे येथे गोकुळ दूध संघाच्या मेळाव्यात बोलताना पालकमंत्री सतेज पाटील. व्यासपीठावर आमदार विनय कोरे, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, कर्णसिंह गायकवाड संजीवनी गायकवाड व मान्यवर उपस्थित होते.