शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळ संचालक ‘अडकले’

By admin | Updated: February 22, 2016 01:04 IST

जाट आंदोलनाचा फटका : हरियाणातील संचारबंदीमुळे २४ तास रस्त्यात

कोल्हापूर : इंडियन डेअरी असोसिएशनच्या परिषदेसाठी हरियाणा येथे गेलेले ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह संचालक, अधिकाऱ्यांना जाट आंदोलनाचा फटका बसला आहे. ‘जाट’ आंदोलनामुळे हरियाणात संचारबंदी लागली आहे. त्यामुळे परिषद संपवून कर्नाळ येथून दिल्लीकडे गाडीतून रवाना झालेले संचालक सोनपतजवळ महामार्गावरच अडकले. वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता नव्हती, थंडीही असल्याने संचालकांसह प्रवाशांना रस्त्यावरच रात्र काढावी लागण्याची भीती होती. रविवारचा दिवस उजाडला तरी वाहतूक सुरळीत झाली नसल्याने काय करायचे, या विवंचनेत संचालक होते. अखेर, नागपूर येथील व हरियाणामध्ये सेवेत असणाऱ्या सीआरएफच्या एका जवानाच्या सहकार्याने दुचाकीवरून संचालकांना कच्च्या रस्त्याने दिल्ली सीमेनजीक आणून सोडले. रविवारी दुपारी चार वाजता अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण नरके, रवींद्र आपटे, पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, रामराजे कुपेकर, अनुराधा पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, स्वीय सहाय्यक संजय दिंडे हे दिल्ली विमानतळावर दाखल झाले. सातच्या विमानाने ते मुंबईसाठी रवाना होणार आहेत. इंडियन डेअरी असोसिएशनची परिषद दि. १८ ते २० फेबु्रवारीदरम्यान हरियाणा येथे होती. यासाठी ‘गोकुळ’ चे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह संचालक, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर त्याचबरोबर पश्चिम विभागातून ‘उत्कृष्ट महिला दूध उत्पादिका’ म्हणून देशपातळीवरील आय.डी.ए.चा प्रथम क्रमांक पटकाविलेल्या सुरेखा शेगुणशी (नूूल, ता. गडहिंग्लज) व त्यांचे पती सुरेश शेगुणशी आदी दि. १७ फेबु्रवारीला रवाना झाले होते. त्रासातून हे बचावले दरम्यान अरुण डोंगळे, विश्वास जाधव, उदय पाटील, राजेश पाटील, अमरिष घाटगे, सत्यजित पाटील, बाबा देसाई हे शुक्रवारीच दिल्लीत पोहोचल्याने आंदोलनाचा फटका बसला नाही.