शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
4
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
5
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
6
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
7
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
8
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
9
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
10
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
11
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
12
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
13
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
14
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
15
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
16
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
17
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
18
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
19
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

‘गोकुळ’मध्ये आतातरी सत्तारूढ गटाबरोबरच

By admin | Updated: March 30, 2015 00:12 IST

राष्ट्रवादीच्या बैठकीत सूर : निर्णय ५ एप्रिलला होणार; ‘केडीसीसी’बाबत काँग्रेसशी आघाडीचे संकेत

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघामध्ये (गोकुळ) सत्तारूढ गटाबरोबर चर्चा सुरू असून सन्मानजनक जागा दिल्या तर त्यांच्याबरोबर जाऊ, अन्यथा पुढील दिशा ठरविली जाईल, याबाबत ५ एप्रिलला निर्णय घेतला जाईल, अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत झाली. ‘केडीसीसी’बाबत काँग्रेसशी आघाडी करण्याचे संकेतही या बैठकीत देण्यात आले. रविवारी सायंकाळी सहा वाजता शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये ‘गोकुळ’ व ‘केडीसीसी’ बँकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. ‘गोकुळ’ निवडणुकीत सत्तारूढ गटाबरोबर जावे यासाठी काही ज्येष्ठ नेत्यांचा आग्रह राहिला तर काहीजणांचा विरोधी गटांबरोबर जावे, असे मत होते. त्यावर सत्तारूढ गटाचे नेते आमदार महादेवराव महाडिक यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे. त्यांच्याकडे चार जागांची मागणी केली असून सन्मानजनक जागा दिल्या, तर सत्तारूढ गटाबरोबर जाण्याची तयारी प्रमुख नेत्यांनी बैठकीत दर्शविली. ५ एप्रिलला सत्तारूढ गटाबरोबर अंतिम चर्चा केली जाणार असून त्याच दिवशी पक्षाची भूमिका जाहीर केली जाईल, असे नेत्यांनी बैठकीत सांगितल्याचे समजते. जिल्हा बँकेसाठी ४ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे, याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रत्येक तालुक्यातून अर्ज दाखल करण्याचे आदेश नेत्यांनी यावेळी दिले. प्रत्येक तालुक्यांत निवडणुकीबाबतचे कार्यालय सुरू करून मतदारांशी संपर्क ठेवण्याचे आदेशही बैठकीत देण्यात आले. उमेदवारी अर्ज भरण्याबाबतची जबाबदारी प्रा. जयंत पाटील व ए. वाय. पाटील यांच्यावर सोपविण्यात आली. बँकेच्या निवडणुकीत काँग्रेससोबत घेण्याची तयारीही नेत्यांनी दाखविली, पण युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर पुढे जाण्याची तयारी ठेवा, असा आदेशही नेत्यांनी दिला. बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, माजी खासदार निवेदिता माने, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, बी. एन. पाटील-मुगळीकर, संजय पाटील-यड्रावकर, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, भैया माने, युवराज पाटील, नाविद मुश्रीफ, पी. जी. शिंदे, गणी फरास, प्रा. जयंत पाटील, अनिल साळोखे, चंद्रकांत बोंद्रे, आर. के. पोवार, सतीश पाटील, रणवीर गायकवाड, बाबूराव हजारे, अरुण इंगवले, मधुकर जांभळे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अशोकराव माने आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘केडीसीसी’त नवीन चेहऱ्यांना संधीकेडीसीसी बँकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पॅनेलमध्ये बहुतांशी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे संकेत यावेळी नेत्यांनी दिले. आगामी काळात बँकेचा कारभार फार जागरूकतेने करावा लागणार असल्याने काही अभ्यासू चेहऱ्यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांशी केवळ चर्चा केली आहे, निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, ‘गोकुळ’बाबत ५ एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय घेतला जाईल.- आमदार हसन मुश्रीफखासदार महाडिक यांची अनुपस्थिती ‘गोकुळ’ व ‘केडीसीसी’ बँकेबाबत राष्ट्रवादीची रविवारी महत्त्वाची बैठक असल्याने जिल्ह्यातील बहुतांशी नेते उपस्थित होते पण खासदार धनंजय महाडिक व आमदार संध्यादेवी कुपेकर अनुपस्थित होते.बंद खोलीत नेत्यांशी स्वतंत्र चर्चादोन्ही संस्थांच्या निवडणुकीबाबत तालुक्यात काय परिस्थिती आहे, याची चाचपणी आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. प्रमुख नेत्यांना स्वतंत्र खोलीत बोलावून मत जाणून घेतले.