शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

‘गोखले’च्या बलदंड खेळाडूंना चकवून गोल

By admin | Updated: December 13, 2014 00:15 IST

कोल्हापूरचा फुटबॉल...

साधारण १९५१-५८ चा तो काळ होता. त्याकाळी ४ फूट १० इंच उंचीच्या आतील मुलांचे सामने रंकाळ्यावर होत असत. मीही त्यात सहभागी होत असे. यावेळी आमच्या संघात अप्पा वणिरे, रामभाऊ ठकार, विनायक कडेकर, आत्माराम मोहिते, दशरथ नलवडे, संभाजी सरनाईक (गोलकीपर) हे खेळत होते. मीही कमी उंचीचा असल्याने त्यांच्यातून खेळत असे. याचदरम्यान मी मॅट्रिक उत्तीर्ण होऊन राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मी फुटबॉल चांगला खेळत असल्याने कॉलेजमध्येही मी फुटबॉलपटू म्हणून सर्वांना परिचित होतो. त्यामुळे कॉलेजच्या संघात माझी वर्णी आपोआपच लागली. संघाचा कर्णधार डी. के. अतितकर व मी उपकर्णधार होतो. आमचा सामना गोखले कॉलेजबरोबर होता. तो सुरू झाल्यानंतर ‘गोखले’कडून सखारामबापू व बाळासाहेब खराडे हे बलदंड शरीराचे खेळाडू आमच्यासमोर होते. त्यांचा खेळ म्हणजे रांगडा फुटबॉल खेळ होता. त्यात ते फुलबॅक होते. मी त्यांच्या गोलक्षेत्रात गोल करण्यासाठी गेलो असता, बाळासाहेब व सखारामबापू माझ्या अंगावर पडले. त्यामुळे मी दबला गेलो. पुन्हा मी उठून या सर्वांना चकवून गोल नोंदविला. समोर नंदू शिंदे हाही कसलेला गोलरक्षक होता. तरीही मी गोल केला, असे एक ना अनेक किस्से ‘आठवणीतील फुटबॉल’ सामन्याविषयी प्रॅक्टिस क्लबचे माजी फुटबॉलपटू बाबासाहेब सूर्यवंशी सांगत होते. आम्ही राहण्यास शिवाजी पेठेतील सरदार तालीम परिसरात होतो. मात्र, मी फुटबॉल मंगळवार पेठेतील त्याकाळच्या प्रॅक्टिस क्लबकडून खेळत असे; कारण माझे मामा त्या ठिकाणी राहत असत. माझे वडीलही संस्थानकाळात महाराजांच्या टीममधून हॉकी खेळत असत. त्यामुळे मला अ‍ॅथलेटिक्स, फुटबॉल या खेळांची आवड निर्माण झाली. पूर्वीच्या तळ्यात आमचा सामना बाराईमाम तालमीबरोबर होता. त्यात लक्ष्मण पिसे हे अत्यंत चपळाईने चेंडू नेण्यात पटाईत होते. याही सामन्यात मी सेंटरपासून सर्वांना चकवीत गोल केला. तो गोल माझ्या कायम स्मरणात राहिला. मी १९५१ ते १९५८ सालापर्र्यंत फुटबॉल खेळलो. पुढे १९६० साली पतियाळाच्या क्रीडा विद्यापीठात माझी निवड झाली आणि मी फुटबॉलपटूचा अ‍ॅथलेटिक्सपटू झालो. त्यावेळी आजच्याइतका फुटबॉल खेळ प्रगल्भ झाला नव्हता. मात्र, पेठापेठांची ईर्षा होती. आज सर्व सुविधा आहेत. कोल्हापूरच्या फुटबॉलला इतकी मोठी परंपरा असल्याने कोल्हापूरचे खेळाडू राष्ट्रीय तसेच राज्य संघात सातत्याने चमकायला हवे होते. शब्दांकन : सचिन भोसले