रत्नागिरी : डीबीजे महाविद्यालय, चिपळूण येथे झालेल्या ४७व्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सवात गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. एकांकिका, स्कीट, मूकअभिनय, एकपात्री, मीमिक्री यातील विविध गटातील आठ कला प्रकारांमध्ये यश प्राप्त करुन मुंबई येथे होणाऱ्या युवा महोत्सवासाठी पात्र झाले आहेत.डी. बी. जे. महाविद्यालयामध्ये झालेल्या महोत्सवात मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मृदुल नीळे, विद्यापीठ समन्वयक संदीप पाटील, जिल्हा समन्वयक प्रा. आनंद आंबेकर यांच्या नेतृत्त्वाखाली ग्रामीण भागातील २५ महाविद्यालये सहभागी झाली होती. वैयक्तिक स्पर्धांमध्ये मीमिक्री (स्नेहा आयरे), पाश्चात्य गायन (स्नेहा आयरे), एकपात्री मराठी (मंथन खांडके, एकपात्री हिंंदी (सायली सुर्वे), मातीकाम (अक्षय पिलणकर), शास्त्रीय गायन (आशुतोष चितळे) तसेच वादविवाद हिंंदी (दिलकश हुश्ये व चांदणी हुश्ये), वादविवाद मराठी (मेघना बेहेरे व मैत्रयी बांदेकर) विजयी झाले. सांघिक स्पर्धांमध्ये मराठी एकांकिका (हिय्या), हिंंदी एकांकिका (ब्रेन) यशस्वी ठरल्या. त्यांचे दिग्दर्शन नीलेश गोपनारायण यांनी केले होते. मराठी स्कीट (उणे ४०), हिंंदी स्कीट (हिरो), मूकअभिनय (आर्टिस्ट) सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी प्रसिध्द अभिनेते भाऊ कदम आणि विनोद गायकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच मीमिक्री व एकपात्री मराठी हिंंदीकरिता शशिकांत केरकर व विजय पगारे यांनी मार्गदर्शन केले.गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक संघाचे व्यवस्थापन प्रा. आनंद आंबेकर प्रा. सनील सावले, प्रा. शरद आपटे, प्रा. यास्मिन आवटे, प्रा. नेहा महाजन यांनी काम पाहिले. प्रा. जयंत अभ्यंकर यांनी वादविवाद स्पर्धेकरिता मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष देव, प्र्रशासकीय उपप्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. अतुल पित्रे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. राजीव सप्रे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, रजिस्ट्रार मोहन कांबळे, प्रसाद गवाणकर तसेच क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ. विनोद शिंंदे यांनी सहकार्य केले होते. स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
गोगटे-जोगळेकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची बाजी
By admin | Updated: August 9, 2014 00:53 IST