शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जोगासिंग घुमान यांचा २५ मे रोजी गौरव

By admin | Updated: May 16, 2015 00:14 IST

सन्मान राष्ट्रीय एकात्मतेचा : मुस्लिम समाज प्रबोधन संस्थेतर्फे आयोजन

कोल्हापूर : पंजाबमधील सरवरपूर या खेड्यात भारत-पाकिस्तान फाळणीत पाडण्यात आलेल्या मशिदीची उभारणी करणाऱ्या जोगासिंग घुमान यांचा मुस्लिम समाजप्रबोधन संस्थेतर्फे गौरव करण्यात येणार आहे. येथील शाहू स्मारक भवनात सोमवारी (दि. २५) सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार असून, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमास कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती आदिल फरास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील, अशी माहिती मुस्लिम समाजप्रबोधन व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हुसेन जमादार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. जमादार म्हणाले, भारत-पाकिस्तान फ ाळणीदरम्यान १९४७ ला झालेल्या दंगलीत पंजाबमधील सरवरपूर या खेड्यातील मशीद दंगलखोरांनी पाडली होती. ही मशीद सरवरपूरमधील प्रगतिशील शेतकरी जोगासिंग घुमान यांच्या पुढाकाराने २००९ मध्ये ग्रामस्थांनी बांधली व तेथील मुस्लिम समाजाच्या स्वाधीन केली. सरवरपूरकरांच्या या राष्ट्रीय एकात्मतेचा सन्मान करण्यासाठी जोगासिंग घुमान आणि रोधासिंग यांचा सन्मान करण्यात येणार आहे. घुमान यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे आहे. या पत्रकार परिषदेला मुस्लिम समाजप्रबोधन व शिक्षण संस्थेच्या संचालिका आयेशा शेख, भास्कर रेळेकर, सुंदर देसाई, गीता गुरव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)घुमान आणि सरवरपूर पंजाबमधील सरवरपूर हे सुमारे शंभर घरांचे खेडे. प्रगतिशील शेतकऱ्यांचे सधन गाव म्हणून सरवरपूरची ओळख आहे. या खेड्यात सुमारे दोनशे ट्रॅक्टर आहेत. १९४७ साली झालेल्या भारत-पाकिस्तान दंगलीमध्ये सरवरपूरमधील मशीद पाडण्यात आली होती. ही मशीद बांधण्याचा निर्णय येथील शीख समाजाच्या गुरुद्वार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार ही मशीद २००९ मध्ये बांधण्यात आली.