शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंंग्लजमध्ये ‘मराठा एकी’ची झलक !

By admin | Updated: October 1, 2016 00:41 IST

भव्य मूकफेरी : मोर्चा पूर्वतयारी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

गडहिंग्लज : कोल्हापुरात होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज शहर व तालुक्यातील मराठा समाजबांधवांनी आपल्या एकजुटीची झलक दाखविली. मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित मेळाव्यास मराठासह सर्वधर्मीय समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेळाव्यानंतर शहरातून भव्य मूकफेरी काढण्यात आली.सायंकाळी येथील बॅ. नाथ पै विद्यालयाच्या मैदानावर हा मेळावा झाला. तत्पूर्वी, युवकांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढली. मेळाव्यानंतर काढण्यात आलेली मूकफेरी लक्षवेधी ठरली. आमदार संध्यादेवी कुपेकर म्हणाल्या, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये आणि उभारणीत मराठ्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता आरक्षणाचा निर्णय व्हावा, अन्यथा वादळापूर्वीची शांतता ठरेल.मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, आरक्षणाच्यानिमित्ताने समाजाच्या एकोप्याची-जिव्हाळ्याची नांदी झाली आहे. ती मोर्चानंतरही कायम राहावी. अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द नव्हे, तर त्याचा गैरवापर होऊ नये, त्यात दुरुस्ती करावी. यावेळी शिवाजीराव भुकेले, यशवंत कोले, पी. डी. पाटील यांचीही भाषणे झाली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वसंत यमगेकर यांनी मागण्यांचे वाचन, तर अ‍ॅड. दिग्विजय कुराडे यांनी मोर्चाची आचारसंहिता सांगितली.मेळाव्यास नगराध्यक्ष राजेश बोरगावे, सभापती मीनाताई पाटील, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, विठ्ठल बन्ने, बाळासाहेब कुपेकर, भय्या कुपेकर, संग्रामसिंह नलवडे, रामराजे कुपेकर, बी. एन. पाटील, नंदिनी बाभूळकर, उदयराव जोशी, राजशेखर दड्डी, बाळेश नाईक, सुनील शिंत्रे, सोमगोंडा आरबोळे, दिलीप माने, रमेश रिंगणे, संजय चाळक, शिवाजी खोत आदी उपस्थित होते. प्रारंभी डॉ. किरण खोराटे यांनी शिववंदना सादर केली. मराठा मंडळाचे अध्यक्ष किरण कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी नगराध्यक्ष राजेंद्र मांडेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)नराधमांना फाशी द्या कोपर्डी घटनेतील नराधमांना फाशी द्या, अशी आग्रही मागणी स्नेहल लवटे, ज्योत्स्ना लोहार व धनश्री देसाई या युवतींनी आपल्या मनोगतातून केली. वर्षा पोटे-पाटील या चिमुकलीचे मनोगतही लक्षवेधी ठरले.