शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार उचल द्या--‘शेकाप’ची साखर आयुक्तांकडे मागणी

By admin | Updated: October 29, 2016 00:20 IST

१४ दिवसांत एकरकमी ‘एफआरपी’ द्यावीच लागेल : शर्मा

कोल्हापूर : यंदाच्या हंगामात तीन हजार रुपये पहिली उचल द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेतली. उसाचे उत्पादन कमी असल्याने साखरेला चांगला दर मिळणार आहे. त्यामुळेच उसाला किमान प्रतिटन ३७०० रुपये अंतिम दर मिळालाच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. साखर कारखान्यांचा यंदाचा हंगाम नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे हातातोंडाशी आलेले ऊस पीक उद्ध्वस्त झाले. त्यानंतर अतिवृष्टीमुळे उसाला फटका बसला. उसाची वाढ होऊ शकलेली नाही. परिणामी, यंदा उसाचे उत्पादन सरासरीपेक्षा ४० टक्के घटणार आहे; त्यामुळे साखर उत्पादनही कमी होणार असून, आगामी काळात साखरेला चांगला भाव मिळू शकतो; पण गेल्या दोन वर्षांची ‘एफआरपी’ सारखीच ठेवल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. दरवर्षी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत जातो, त्या पटीत ‘एफआरपी’त वाढ होणे अपेक्षित होते. गतहंगामात प्रतिकूल हवामानामुळे साखर उतारा घटला आहे. परिणामी, सरासरी ‘एफआरपी’मध्ये एक टक्क्याने घट होणार आहे. त्याचा फटका प्रतिटन २४२ रुपये बसणार आहे. त्याचबरोबर ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीत २० टक्के, तर मुकादमांच्या मजुरीमध्येही अर्धा टक्का वाढ झाली आहे. यामुळे या हंगामात तीन हजार पहिली उचल व ३७०० रुपये अंतिम दर द्यावा, अशी मागणी ‘शेकाप’चे राज्य सहचिटणीस माजी आमदार संपतराव पवार यांनी केली. यावर १४ दिवसांत एकरकमी एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे; पण गतवर्षी तडजोड झाल्याने दोन हप्ते झाले. यंदा मात्र एकरकमी एफआरपी कारखानदारांना द्यावीच लागेल, असे शर्मा यांनी सांगितले. यावेळी संजय डकरे, सरदार पाटील, अंबाजी पाटील, केरबा पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)उसाला तीन हजार रुपये पहिली उचल द्यावी, या मागणीचे निवेदन ‘शेकाप’च्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त विपीन शर्मा यांना दिले. यावेळी संपतराव पवार, बाबासाहेब देवकर, केरबा पाटील, आदी उपस्थित होते.