शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लाभाची रक्कम थेट घरी देणार

By admin | Updated: November 4, 2014 00:23 IST

निराधार योजना : इचलकरंजीतील १०,७४४ लाभार्थ्यांना मिळणार लाभ

इचलकरंजी : संजय गांधी निराधार व तत्सम योजनेंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्यापासून त्यांच्या घरी जाऊन लाभाची रक्कम देण्याचा निर्णय येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या योजनेतील १०,७४४ लाभार्थ्यांना देण्यात येणारी ६९ लाख रुपयांची रक्कम प्रती महिना बायोमॅटिक पद्धतीने आणि आयसीआयसीआय बॅँकेमार्फत मिळणार आहे.आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. बैठकीसाठी पुरवठा निरीक्षण अधिकारी के. बी. देसाई, अव्वल कारकून बाळासाहेब कोळी, पुरवठा निरीक्षक सचिन हाके, राहुल काळे, महेश खेतमर, वरणे, राखी माने, आदी अधिकारी उपस्थित होते. इचलकरंजी शहरासह चंदूर, कबनूर, कोरोची, खोतवाडी व तारदाळ या गावांत २० केंद्रे स्थापून तेथून लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या हातात दिली जाईल, असे आमदार हाळवणकर यांनी बैठकीनंतर सांगितले. ते म्हणाले, सध्या या योजनेतील लाभार्थ्यांना जिल्हा मध्यवर्ती बॅँकेमार्फत रक्कम दिली जाते. त्यामुळे बॅँकेकडे वृद्ध, अपंग अशा लाभार्थ्यांची गर्दी होते. रक्कम घेण्यासाठी दिवसभर रांगेत थांबावे लागते. तसेच बॅँकेतील रक्कम मिळवून देण्यासाठी काही एजंटही निर्माण झाले आहेत. त्यांना ठरावीक रक्कम द्यायला लागते. असा सर्व प्रकारचा त्रास वाचविण्यासाठी लाभार्थ्यांच्या गावात व परिसरात असलेल्या २० केंद्रांतून ही रक्कम दिली जाईल. तसेच शहरातील ५० हजार ३५९ केसरी शिधापत्रिकाधारकांना पुढील महिन्यापासून दहा किलो गहू व पाच किलो तांदूळ नियमितपणे देण्याची व्यवस्था करण्यात येईल. शिधापत्रिकांवरील धान्य मिळणारी दुकाने सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ या वेळेत नियमितपणे उघडली जातील. हयगय करणाऱ्या दुकानांची पुरवठा निरीक्षकांकडून अचानक भेटी देऊन तपासणी होईल. तसेच नवीन शिधापत्रिका, दुबार शिधापत्रिका आणि विभक्त शिधापत्रिका देण्यासाठी शहरातील सर्व नऊ महा ई- सेवा केंद्रांमध्ये अर्ज भरून घेतले जातील. तशी सुविधा करण्याच्या सूचना तहसीलदारांकडून दिल्या जातील आणि या शिधापत्रिका १५ दिवसांत मिळण्याची सोय केली जाईल, असेही या बैठकीमध्ये निश्चित केले. (प्रतिनिधी)कारवाईचा निर्णयशिवाजी खावट यांच्या पिवळ्या शिधापत्रिकेवर नियमाप्रमाणे युनिट वाढवून न देणाऱ्या दुकानदार दिनकर पाटील यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचा निर्णय याच बैठकीत घेण्यात आला. तसेच शहरात व ग्रामीण भागात विविध ठिकाणी असलेल्या दुकानांना निरीक्षकांनी नियमितपणे पण अचानक भेटी देऊन तपासणी करावी, असेही यावेळी ठरविण्यात आले.