शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापर्यंत लेखी सूचना द्या : पवार

By admin | Updated: October 24, 2016 00:46 IST

प्राधिकरण : हद्दवाढविरोधी समितीची बैठक

कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीला मुख्यमंत्र्यांनी प्राधिकरणाचा पर्याय दिला आहे. या संदर्भात विकासाच्या संकल्पना काय असाव्यात, यासाठी लेखी सूचना उद्या, मंगळवारपर्यंत द्याव्यात, असे आवाहन सर्वपक्षीय हद्दवाढविरोधी कृती समितीचे अध्यक्ष माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी रविवारी येथे केले. ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृह येथे प्राधिकरणासंदर्भात सूचना मागविण्यासाठी सर्वपक्षीय हद्दवाढविरोधी कृती समितीतर्फे आयोजित १८ गावांतील प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, विकासासाठी राज्यात इतर ठिकाणी राबविलेली प्राधिकरणे वेगळी आहेत. कोल्हापूरसाठी मुख्यमंत्र्यांनी पर्याय दिलेले प्राधिकरण वेगळे आहे. १८ गावांसाठी व दोन एमआयडीसींकरिता हे प्राधिकरण असणार आहे. प्रवक्ते नाथाजीराव पोवार म्हणाले, कोल्हापूरला पर्याय दिलेल्या प्राधिकरणाबाबत संबंधित गावांनी आपली मते मांडून ती शासनाला कळविणे गरजेचे आहे. आम्हाला कशा प्रकारचा विकास हवा आहे, शासनाने आम्हाला या सुविधा द्याव्यात अशा सूचना येणे अपेक्षित आहे. या लेखी स्वरूपातील सूचना उद्या, मंगळवारपर्यंत संबंधित गावांनी द्याव्यात. त्या एकत्र करून त्यांवर कृती समितीतर्फे आपलेही मत जोडून या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना गुुरुवारी (दि. २७) सादर केल्या जातील. बैठकीत १८ गावांतील प्रतिनिधींनी आपल्या सूचना तोंडी मांडल्या. आमचे हक्क अबाधित राहिले पाहिजेत, विकासाची वाढ करताना ती आडवीऐवजी उभी करावी, जेणेकरून उत्पन्नाचे स्रोत असलेल्या शेतीचे नुकसान होणार नाही, अशा स्वरूपाच्या सूचना मांडण्यात आल्या. यावेळी महेश चव्हाण, एम. एस. पाटील, रावसाहेब दिगंबरे, सलीम महात, आदींसह १८ गावांतील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. (प्रतिनिधी) ४संपतराव पवार-पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढीऐवजी प्राधिकरणाचा दिलेला पर्याय ही एक संधी आहे. त्यांनी ग्रामीण भागातील लोकांचे हक्क अबाधित ठेवून विकास केला जाईल, अशी यापूर्वीच ग्वाही दिली आहे. ४त्यामुळे प्राधिकरणाच्या माध्यमातून आपापल्या गावात विकासाची नेमकी संकल्पना काय आहे, याबाबत लेखी सूचना मंगळवारपर्यंत प्रवक्ते नाथाजीराव पोवार यांच्याकडे द्याव्यात. या सूचनांचे एकत्रीकरण करून त्या गुरुवारी (दि. २७) जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्या जाणार आहेत.