शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' महिलेला पर्यायी जागा द्या

By admin | Updated: February 4, 2015 00:47 IST

राजाराम माने : नानीबाई चिखली ग्रामपंचायतीला सूचना

म्हाकवे : पतीचे एड्सने निधन झाल्याने नानीबाई चिखली (ता. कागल) येथील ग्रामपंचायतीने राहण्यासाठी जागा उपलब्ध करून न दिल्याने थेट स्मशान शेडमध्येच संसार थाटलेल्या संगीता संजय गायकवाड यांची बातमी प्रसिद्ध होताच त्याची जिल्हा प्रशासनाने त्वरित दखल घेतली. पर्यायी जागा देण्याची सूचना जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी दिल्या.जिल्हाधिकारी माने, तहसीलदार शांताराम सांगडे, मुरगूडचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत मस्के, मंडल अधिकारी सुंदर जाधव आदींनी दखल घेऊन ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाला गायकवाड यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासंबंधी सूचना दिल्या. त्यानंतर येत्या पंधरा दिवसांत गायकवाड यांना पर्यायी जागा उपलब्ध करण्याचे आश्वासन सरपंच मुहम्मद मुल्लाणी यांनी दिले.१४ वर्षांपूर्वी शेतमजुरीच्या निमित्ताने यल्लूर (ता. वाळवा) येथून गायकवाड कुटुंब येथे आले. १ जानेवारी २०१३ मध्ये संजय गायकवाड यांचे एड्समुळे निधन झाले. त्यानंतर दोन मुलांसह संगीता या भाड्याच्या घरात राहत होत्या; परंतु दोन ते तीन घरमालकांनी त्यांना घराबाहेर काढल्यामुळे तिचा संसार उघड्यावर पडला. राहण्यासाठी जागा मिळावी, यासाठी त्यांनी वारंवार ग्रामपंचायत, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्जविनंत्या केल्या; परंतु कायद्यातील नियमावली सांगून प्रशासनाने वेळकाढूपणाच केला. त्यामुळे त्यांनी आपला संसार थेट स्मशान शेडमध्येच थाटला. कोंबड्यासह दोन जनावरांनाही तेथेच बांधण्यात आले. जिल्हाधिकारी माने यांनी या महिलेला शासकीय गायकवाड यांना वसतिगृहात जाण्यासंबंधी पर्याय सुचविला; परंतु त्याला विरोध करत तेथेच जागा देण्याचा त्यांनी हट्ट धरला. ग्रामपंचायतीकडून जागेची व्यवस्था होईपर्यंत सामाजिक कार्यकर्ते नितीन मगदूम यांनी आपल्या शेतवडीतील जागा देण्याचे मान्य केले. यावेळी युवा नेते प्रवीण भोसले, तंटामुक्त अध्यक्ष रामचंद्र बेनाडे, तलाठी पी. आर. फर्नांडिस आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)