शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

तावडेला कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात द्या

By admin | Updated: June 21, 2016 01:16 IST

न्यायालयाचे आदेश : सनातन संस्थेची ११९ बँक खाती; मलगौंडा पाटील, विनय पवार यांना बँक खात्यात स्वाक्षरीचे अधिकार; सीबीआयची माहिती

पुणे/कोल्हापूर : सनातन संस्थेची ११९ बँक खाती असून, त्यातील काही बँकेच्या खात्यात स्वाक्षरीचे अधिकार मलगौंडा पाटील आणि विनय पवार यांना होते़ त्यांनी फरार असताना त्याचा वापर केला आहे का, याचा तपास सीबीआय करणार असून, तशी माहिती सोमवारी न्यायालयात देण्यात आली. दरम्यान, ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी हिंदू जनजागरण समितीचा डॉ. वीरेंद्र तावडे याचा ताबा घेण्याची परवानगी पुणे न्यायालयाने सोमवारी कोल्हापूर पोलिसांना दिली. सनातनचा पैसा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात वापरण्यात आला आहे का, तसेच वीरेंद्र तावडे हा १६९ जणांच्या संपर्कात होता़ त्याने आपल्या दुचाकीचे तपशील रविवारी दिले असून, त्याने पुण्यातील ज्या साधकाकडे ही गाडी ठेवली आहे, त्याला ताब्यात घेत असल्याचे सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात सांगून तावडेची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली़ मात्र, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही़ बी़ गुळवे पाटील यांनी सीबीआयची मागणी फेटाळून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ तावडे याची सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला पुण्यातील जिल्हा न्यायालयात दुपारी हजर केले़ पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तावडेला चौकशीसाठी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात द्यावे, असा कोल्हापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश पोलिसांनी पुण्यातील न्यायालयात सादर केला़ त्याला गुळवे पाटील यांनी मान्यता दिली़ सीबीआयचे वकील राजू यांनी सांगितले की, सनातन संस्थेची ११९ बँक खाती असून, काही खात्यांचे व्यवहार करण्याचे अधिकार मलगौडा पाटील, रुद्र पाटील, विनय पवार यांना होते़ हे अधिकार वेळोवेळी बदलत गेले़ सारंग अकोलकर, विनय पवार हे फरारी असतानाही या बँक खात्याचा वापर करीत होता का? याचा तपास करायचा आहे़ फरार असलेल्या सनातनच्या साधकाकडून १६९ मोबाईल क्रमांकांवर संपर्क ठेवला गेला असल्याची माहिती मिळाली असून, ते कोणाचे आहेत, याचा तपास करायचा आहे़ (प्रतिनिधी)पुण्यातील आणखी एक साधक ‘रडार’वरतावडे हा सहकार्य करीत नसून त्याने आपली दुचाकी पुण्यातील ज्या साधकाला दिली आहे़, त्याची माहिती त्याने रविवारी दिली़ या दुचाकीचा वापर डॉ़ दाभोलकर यांच्या हत्येच्या वेळी केल्याचा संशय आहे़ या साधकाला आज ताब्यात घेऊन चौकशी केली जाणार आहे.गेली २ वर्षे १० महिने हा तपास सुरू असून त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही़ जयंत आठवले यांनी लिहिलेल्या पुस्तकावर बंदी नसून, ते भगवतगीतेवर आधारित आहे़ त्यांना आरोपीची नाही तर सनातन संस्थेची चौकशी करायची आहे़ यापूर्वी सीबीआयला चौकशी करण्याबाबत ९ पत्रे लिहिली आहेत़ त्याचे त्यांनी काहीही उत्तर दिलेले नाही़, असा युक्तीवाद तावडेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केला. तावडेचा राहणार पोलिस मुख्यालयातच मुक्काम कोल्हापूर : दाभोलकर हत्याप्रकरणात अटकेत असलेला डॉ. वीरेंद्र तावडे याला कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश पुण्यातील न्यायालयाने दिल्यानंतर कोल्हापुरात त्याची चौकशी कोठे करायची याचे नियोजन कोल्हापूर पोलिसांनी केले आहे.संशयित समीर गायकवाड याच्याकडे पोलिसांनी मुख्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सात नंबरच्या कक्षात चौकशी केली होती. त्याच कक्षामध्ये त्याचा चौदा दिवस मुक्काम होता. या कक्षामध्ये डॉ. तावडेला ठेवून दिवस-रात्र त्याची चौकशी केली जाणार आहे. तावडेविरोधात सबळ पुरावे गोळा करून ते न्यायालयात सादर केले जाणार आहेत. जेणेकरून त्याच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ मिळू शकेल. यासाठी पोलिसांची एक विशेष यंत्रणा काम करीत आहे. पोलिसांमध्ये अस्वस्थता पानसरे यांच्या हत्येनंतर साक्षीदार संजय साडविलकर याने तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, तत्कालीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंकित गोयल, तत्कालीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस. चैतन्या, पोलिस निरीक्षक अमृत देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, श्रीकांत मोहिते (एटीएस अधिकारी), कॉन्स्टेबल विजय पाटील यांची भेट घेऊन वीरेंद्र तावडे याचा या हत्येमध्ये संशय असल्याची माहिती दिली होती; परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे ‘सीबीआय’च्या अधिकाऱ्यांना सांगितले. साक्षीदाराने केलेल्या आरोपांमुळे कोल्हापूर पोलिसांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. साडविलकर, तावडे यांची होणार चौकशी डॉ. दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ‘सीबीआय’ला माहिती देणारा कोल्हापूरचा कट्टर हिंदुत्ववादी साक्षीदार संजय साडविलकर याला पोलिसांनी बंदोबस्त पुरविला आहे. डॉ. तावडे व साडविलकर यांना समोरासमोर घेऊन चौकशी केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तावडेकडे सापडले आक्षेपार्ह साहित्य !सनातनचे संस्थापक जयंत आठवले यांनी लिहिलेल्या ‘क्षात्रधर्म साधना’ या पुस्तकातील ११ व्या अध्यायात दृष्ट प्रवृतींचा नाश आध्यामिक शक्तीद्वारे करण्याचे लिहिले आहे़ याशिवाय त्यांनी लिहिलेल्या ‘स्पिरिच्युआलिटी’ या पुस्तकात डॉ़ नरेंद्र दाभोलकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि कॉ. पानसरे यांचा उल्लेख असलेले साहित्य तावडे याच्याकडे सापडले आहे़ कोल्हापूर पोलिस घेणार दोन दिवसांत ताबाज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी हिंदू जनजागरण समितीचा डॉ. वीरेंद्र तावडे याचा ताबा घेण्यासंबंधी ‘एसआयटी’ व कोल्हापूर पोलिसांची दोन दिवसांत बैठक होत आहे. त्यानंतर कोल्हापूर पोलिस त्याचा ताबा घेऊन त्याला सत्र न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी दिली. तावडेच्या अटकेनंतर पानसरे हत्येच्या तपासाला आणखी गती येणार आहे. वीरेंद्र तावडे याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीमध्ये आठ वर्षांपूर्वीचे कोल्हापूर कनेक्शन पुढे आले. तो पानसरे हत्या प्रकरणात पहिल्यापासून कोल्हापूर पोलिसांच्या रडारवर होता. संशयित समीर गायकवाडच्या चौकशीमध्ये त्याचे नाव पुढे आले आहे. समीरनंतर दुसरा संशयित तावडे होता. त्याला घाईगडबडीत अटक करून त्याचा ‘दुसरा समीर’ होऊ नये, याची दक्षता कोल्हापूर पोलिसांनी घेतली होती. त्याला अटक केल्यानंतर पानसरे हत्येसंबंधी धक्कादायक पुरावे हाती येतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.