शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीला साखर द्या, अन्यथा टाळे ठोक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 16:51 IST

कोल्हापूर : दारिद्रय रेषेखालील रेशन कार्डवरील साखर बंद केल्याच्या निषेधार्थ राष्टÑीय काँग्रेसच्यावतीने संजय पाटील यांनी शिष्ठमंडळासोेबत जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पुरवठा विभागाला मिठाची मिठाई भेट देऊन अभिनव पध्दतीने आंदोलन केले.गोरगरिबांच्या तोंडची साखर हिरावून घेऊ नका असे सांगत ही कार्डधारकांची साखर सुरु न झाल्यास पुरवठा विभागाला टाळे ठोक आंदोलन करण्याचा इशाराही दिला. ...

ठळक मुद्देकोल्हापूरात काँग्रेसचे आंदोलन पुरवठा अधिकाºयांना मिठाची मिठाई भेट

कोल्हापूर : दारिद्रय रेषेखालील रेशन कार्डवरील साखर बंद केल्याच्या निषेधार्थ राष्टÑीय काँग्रेसच्यावतीने संजय पाटील यांनी शिष्ठमंडळासोेबत जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पुरवठा विभागाला मिठाची मिठाई भेट देऊन अभिनव पध्दतीने आंदोलन केले.

गोरगरिबांच्या तोंडची साखर हिरावून घेऊ नका असे सांगत ही कार्डधारकांची साखर सुरु न झाल्यास पुरवठा विभागाला टाळे ठोक आंदोलन करण्याचा इशाराही दिला. याबाबतचे निवेदन महिलांच्या शिष्ठमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवाणे यांना दिले.

राज्यातील सुमारे २५ लाख दारिद््ररेषेखालील कुटूंबांची यंदाची दिवाळी गोड होणार नाही. बीपीएल कुटूंबांची साखर बंद करुन गरीबांना चहा पिणेही अवघड केले आहे. अंत्योदय कुटूंबांनाही ५ रुपय किलोने मिळणारी साखर २० रुपये वाढ केली आहे. राज्य सरकारने केंद्राचा निर्णय म्हणून हात झटकले आहेत.

राज्य सरकारने तिजोरीतून काही निधी खर्चून राज्यातील ४५ हजार बीपीएल धारकाना साखर उपलब्ध करुन द्यावी. केंद्राने इंधन दरवाढीतून लुटलेला पैसा गरीबांसाठी साखर खरेदीवर वापरावा असे सांगून रेशनव्यवस्था संपविण्याचे षडयंत्र सरकार रचत असल्याचा आरोप संजय पाटील यांनी केला. दिवाळीसाठी साखर उपलब्ध करुन न दिल्यास पुरवठा विभागाला टाळे ठेोकण्याचा इशारा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांना दिलेल्या निवेदनातून केला.

या आंदोलनात अमिना मुजावर, बेबी थोरात, बीबीजान फरझान, गुजराबाई शितळे, सुंदराबाई शिंदे, कल्पना दगडे, लक्ष्मी सुतार, कृष्णाबाई कदम, रुपाली भोसे, कमल दगडे, सविता मंडल, लक्ष्मी आवटे, यास्मिन कांबळे, मदिना सय्यद, मिताली मुलीममी, प्रशांत गवळी, रोमा भोरे, अनुसया बेनोदे आदींचा सहभाग होता. दारिद्ररेषेखालील रेशनकार्डधारकांची साखर शासनाने बंद केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी राष्टÑीय काँग्रेसचे संजय पाटील यांनी शिष्ठमंडळासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हा पुरवठा अधिकाारी विवेक आगवणे यांना मिठाचा बॉक्स भेट दिला.