शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

इचलकरंजीत आॅक्सिजन पार्कसाठी जागा देणार

By admin | Updated: June 22, 2016 01:30 IST

शुभांगी बिरंजे : मारवाडी युवा मंचचा कार्यक्रम उत्साहात

इचलकरंजी : वृद्धांसाठी शहरात आॅक्सिजन पार्क निर्माण व्हावा, यासाठी मारवाडी युवा मंचला नगरपालिकेतर्फे सभेत ठराव करून जागा देण्यात येईल, असे आश्वासन नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे यांनी दिले.येथील घोरपडे नाट्यगृहात मारवाडी युवा मंचच्या २५व्या वर्षांतील पदार्पण, नूतन पदाधिकारी निवडी, तसेच गणराया अवॉर्ड २०१५-१६ चे वितरण अशा संयुक्त कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सिनेअभिनेत्री महिमा चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. नगराध्यक्ष बिरंजे यांनी मारवाडी युवा मंचला जागा दिल्यास ते निश्चितच आॅक्सिजन पार्क उभारतील, असा विश्वास व्यक्त केला. सिनेअभिनेत्री चौधरी यांनी मारवाडी युवा मंचच्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपण अशा कार्यक्रमात उपस्थित राहतो.माजी आमदार राजीव आवळे, नेमीचंद जांगेड, महावीर जैन, प्रदेश उपाध्यक्ष सुशील इनाणी, विभा पाटणी यांची प्रमुख उपस्थिती होती. मावळते अध्यक्ष दिनेश बांगड, सचिव गणेशकांत मालपाणी, कोषाध्यक्ष रामगोपाल वर्मा यांनी आपला पदभार नूतन अध्यक्ष रामकिशोर वर्मा, सचिव राधेश्याम झंवर, कोषाध्यक्ष प्रवीण पाटणी यांना सोपविला. नूतन निवडीमध्ये उपाध्यक्ष विनित तोष्णीवाल, हरीश बोहरा, अमित राठोड, मनोज चौधरी, सहसचिव अनिल जैन, हिरेन चोपडा, सनत दायमा, आदींसह कार्यकारिणीचा समावेश आहे.कार्यक्रमास चंद्रप्रकाश छाजेड, पन्नालाल डाळ्या, नितीन धूत, हेमा डाळ्या उपस्थित होते. ओम पाटणी यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)