शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी जागा स्वच्छ करण्याकरिता नोटिसा द्या, आयुक्तांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 13:26 IST

खासगी जागेतील स्वच्छता करण्यासंदर्भात तसेच तेथील तणकट काढण्याकरिता संबंधित मिळकतधारकांना नोटीस बजावा; तसेच संबंधित मिळकतधारकाकडून कामाची पूर्तता न झाल्यास महापालिकेमार्फत स्वच्छता करून तिचा खर्च संबंधितांकडून वसूल करावा, असे निर्देश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले.

ठळक मुद्देखासगी जागा स्वच्छ करण्याकरिता नोटिसा द्याआढावा बैठकीत आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

कोल्हापूर : खासगी जागेतील स्वच्छता करण्यासंदर्भात तसेच तेथील तणकट काढण्याकरिता संबंधित मिळकतधारकांना नोटीस बजावा; तसेच संबंधित मिळकतधारकाकडून कामाची पूर्तता न झाल्यास महापालिकेमार्फत स्वच्छता करून तिचा खर्च संबंधितांकडून वसूल करावा, असे निर्देश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले.ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात आयुक्त कलशेट्टी यांनी आरोग्य विभागाकडील सर्व विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, सहायक आरोग्य निरीक्षक यांची स्वच्छ भारत अभियान, नालेसफाई, ओ.डी.एफ. प्लस, इत्यादी विषयांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित केलेली होती.या आढावा बैठकीमध्ये आयुक्त कलशेट्टी यांनी शहरातील पूर परिस्थितीबाबत माहिती घेतली. त्यानंतर सर्व आरोग्य निरीक्षक यांना शहरातील सर्व मुख्य रस्ते स्वच्छ करावेत, कंटेनरसभोवतालचा कचरा तातडीने उठाव करण्यासाठी विशेष पथक तयार करावे, शहरातील सर्व शौचालयांची नियमितपणे स्वच्छता करावी, शौचालयासभोवतालचा परिसराचे सुशोभीकरण करावे, अशा सूचना दिल्या.शहरातील सर्व तरुण मंडळे, धार्मिक मंडळे, भक्तांना महाप्रसाद अथवा अन्य धार्मिक कार्यांवेळी प्रसाद देण्याकरिता कागदी अथवा प्लास्टिक पत्रावळी, प्लेट, ग्लास, ताट, कप, इत्यादी न वापरता स्टीलच्या प्लेट वापरण्याबाबत आवाहन करण्याच्या सूचना दिल्या.झोपडपट्टी भागामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याबरोबरच झोपडपट्टी सुशोभीकरण करण्याकरिता नोडल आॅफिसर म्हणून अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता, जल अभियंता, आरोग्याधिकारी, उपशहर अभियंता, मुख्य आरोग्य निरीक्षक, तसेच इतरही वरिष्ठ अधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. आढावा बैठकीस उपायुक्त मंगेश शिंदे, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर