शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआरबी’ला कायद्याच्या आधारे दणका देऊ

By admin | Updated: November 18, 2014 00:07 IST

महापौर : महापालिकेत कृती समितीच्या कार्यकर्त्यांची झाली बैठक

कोल्हापूर : एकात्मिक रस्ते प्रकल्पाच्या कराराप्रमाणे अनेक कामे ‘आयआरबी’ने केलेली नाहीत. फुलेवाडी नाक्याच्या पूर्वेकडील रस्ता, कळंबा, आर. के. नगर, उचगाव, सरनोबतवाडी या नाक्यांजवळील रस्तेही करण्याची तसदी घेतलेली नाही. खराब रस्त्याप्रकरणी सर्व नाक्यांबाबत पोलिसांत तक्रार देऊन नाके जप्त करण्याची कारवाई करा, अशी मागणी आज, सोमवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी महापौर तृप्ती माळवी यांना निवेदनाद्वारे केली. कायद्याच्या आधारे आयआरबीला दणका देऊ. टोल आंदोलनात यापुढेही सक्रिय असेन, असे आश्वासन महापौरांनी कार्यकर्त्यांना दिले.शहरातील अर्धवट राहिलेल्या खराब रस्त्यांची जबाबदारी घेण्यास आयआरबीने नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी निवास साळोखे यांच्या नेतृत्वाखाली महापौरांची भेट घेतली. महापालिकेच्या स्थायी सभागृहात कार्यकर्त्यांशी महापौरांनी चर्चा केली. यावेळी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शहरातील सहा टोलनाके नागरिकांना त्रासाचे ठरत आहेत. या सर्व सहा टोलनाक्यांवररितसर कायदेशीर कारवाई करून अतिक्रमण पथकाकडून हटविण्यात यावेत. याकामी महापौरांनी हाक दिल्यास सर्व कोल्हापूरकर त्यांच्या मदतीला धावून येतील. नाके काढल्यानंतरही टोलवसुली सुरू केल्यास त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार द्यावी, अशी मागणी कृती समितीने निवेदनाद्वारे केली.‘आयआरबी’ने कराराचा केलेला भंग व अद्याप करावयाचे रस्ते याबाबत कारवाईसाठी महापालिका कायदेतज्ज्ञांच्या सल्ला घेईल. कायद्याच्या आधारे आयआरबीवर कठोर कारवाई करण्यास महापालिका प्रशासन बांधील आहे. टोल आंदोलनात पूर्वीप्रमाणेच सक्रिय राहीन. - महापौर तृप्ती माळवी