शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

पेन्शन मिळावी ती सन्मानाने

By admin | Updated: December 16, 2014 23:51 IST

पेन्शनर्स डे : बँकांकडून सन्मानजनक वागणूक मिळण्याची पेन्शनरांची अपेक्षा

भारत चव्हाण - कोल्हापूर -‘पेन्शन ही भीक नाही, तर तो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे’ असा निवाडा देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या सन्मानार्थ ‘पेन्शनर्स डे’ साजरा केला जातो खरा, परंतु या न्यायनिवाड्यानंतरही काही राष्ट्रीयीकृत बँका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ती देताना उपकार करीत असल्यासारखी वागणूक देत असतात. पेन्शनर आणि इतर ग्राहकांना त्रास होणार नाही, याकरिता बँकांनी सेवानिवृत्तांसाठी स्वतंत्र खिडकी उघडून पेन्शनचे वितरण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.१७ डिसेंबर १९८२ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी पेन्शनबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता, तेव्हापासून देशभरात सर्वत्र १७ डिसेंबर हा दिवस ‘पेन्शनर्स डे’म्हणून साजरा केला जातो. शासकीय, निमशासकीय तसेच काही खासगी कंपन्यांकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाते; परंतु ती पदरात पडेपर्यंत अनेकवेळा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अपमान, निराशा, आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो, असा सार्वत्रिक अनुभव आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बँका चांगली वागणूक देत नाहीत, अशी भावना आहे. बऱ्याचवेळा बँकांच्या कर्मचाऱ्यांमुळे सेवानिवृत्तांना त्रास सहन करावा लागतो, फेऱ्या माराव्या लागतात. ट्रेझरीकडून संबंधित बँकांना वेळेत धनादेश पोहोचतात; पण बँकांच्या मुख्य कार्यालयाकडून संबंधित शाखेकडे वेळेत पैसे वर्ग होत नाहीत. खात्यावरील पेन्शनची रक्कम काढताना तासन्-तास रांगेत उभे राहावे लागते. वयोवृद्ध पेन्शनरना ऐकता येत नाही, गुडघेदुखीचा त्रास असतोे; पण त्यांच्यासाठी साधी बैठक व्यवस्थाही बँका करत नाहीत. पेन्शनरांसाठी स्वतंत्र खिडकी सुरू करा, म्हटले तरी बँका त्याची दखल घेत नाहीत. शहरी भागातील पेन्शनरांना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला पेन्शनची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होत असली, तरी ग्रामीण भागात मात्र आठ, दहा, पंधरा तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. अलीकडे बँकांची कामे आॅनलाईन झाली असली तरीही ग्रामीण भागातील पेन्शनरांना त्याचा काहीच उपयोग होत नाही. पेन्शन उशिरा का मिळते याची चौकशीही करणे अशक्य होऊन बसते. त्यामुळे मिळेल त्याचवेळी पेन्शन घेण्याची वेळ पेन्शनधारकांवर येते. ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचा सत्कारराज्य सरकारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेतर्फे ‘पेन्शनर्स डे’च्या निमित्ताने प्रत्येक वर्षी कोल्हापुरात ७५ वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येतो. तसेच त्यांच्या नातवंडांनी दहावी परीक्षेत चांगले यश मिळविले असेल, तर त्यांचा बक्षीस व प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात येतो. यंदा हा कार्यक्रम २९ डिसेंबरला होत आहे.बॅँकांनी ज्येष्ठ, वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मानसिक तसेच शारीरिक अवस्था पाहून त्यांना सुविधा दिल्या पाहिजेत. लांबलचक रांगेत त्यांना ताटकळत न ठेवता पेन्शनरांसाठी स्वतंत्र खिडकी सुरूकेली पाहिजे. कोणाही पेन्शनरांना फेऱ्या मारायला लागू नयेत, याची खबरदारी घेण्यात यावी.- मोहन गणेश फडके, सदस्य : कार्यकारी मंडळ