शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेला गतवैभव देऊ

By admin | Updated: April 28, 2015 00:46 IST

हसन मुश्रीफ : जिल्हा बँकेच्या ठरावधारक मतदारांचा कागलमध्ये मेळावा

कागल : सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंहराजेंच्या निधनामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. ती काही प्रमाणात भरून काढण्याची जबाबदारी कागल तालुक्यावर आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक चालविण्याचे मोठे आव्हान आहे. म्हणून सर्वसमावेशक पॅनेल केले आहे. कोणतीही भिडभास्त न ठेवता बँक काटेकोरपणे चालवून तिला गतवैभव प्राप्त करून देऊ, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.येथील अलका शेतीफार्मवर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात ठरावधारक मतदारांचा मेळावा सोमवारी घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ‘गोकुळ’चे नूतन संचालक रणजितसिंह पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवराज पाटील, नगराध्यक्षा आशाकाकी माने, डी. डी. चौगुले, रंगराव पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.आमदार मुश्रीफ म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मुरगूडच्या पाटील बंधूंनी आमच्यासाठी जिवाचे रान केले, म्हणून त्यांना ‘गोकुळ’द्वारे साथ द्यायचीच ही भूमिका निश्चित होती. जिल्हा बँकेत सर्वसमावेशक पॅनेल करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. त्याला जिल्ह्यातील नेत्यांनी पाठिंबा दिला. त्यातून प्रा. संजय मंडलिकांची उमेदवारी आमच्या पॅनेलमधून निश्चित झाली आहे. यामुळे आम्ही पाटील गटाला कधीही अंतर देणार नाही. समरजितसिंह घाटगे यांनाही भेटणार आहे.भैया माने म्हणाले, एक कार्यकर्ता म्हणून मला संधी मिळाली आहे. मुश्रीफ यांच्या पुढाकारातून विविध पक्ष-विचारांचे लोक बँक वाचविण्यासाठीच एकत्र आले आहेत. रणजितसिंह पाटील म्हणाले, गोकुळ दूध संघात यापूर्वी जसे काम केले, तसे राजकारणविरहित काम करीत राहू. कोणतेही तेथे राजकारण करणार असेल, तर जाहीररीत्या विरोधाची भूमिका घेऊ.शामराव पाटील यांनी स्वागत, प्रवीणसिंह भोसले यांनी प्रास्ताविक केले. विकास पाटील (कुरकलीकर) यांनी आभार मानले. यावेळी बाळासाहेब तुरंभे, आनंदराव अस्वले, प्रकाश गाडेकर, शामराव घाटगे, अरुण भोसले, रघुनाथ जकाते, इरफान मुजावर, रमेश तोडकर, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)