शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज पालिकेचा निधी परत द्या

By admin | Updated: April 6, 2016 00:46 IST

जनआंदोलनाचा इशारा : राष्ट्रवादीसह इंजिनिअर्स असोसिएशन, सलवादे युवा ग्रुपतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेतर्फे बांधण्यात येणाऱ्या सांस्कृतिक केंद्र व वाचनालयासाठी वितरीत करून परत घेण्यात आलेला ५ कोटींचा निधी परत मिळावा, अशी कळकळीची विनंती करतानाच निधी परत न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारादेखील येथील विविध संघटनांनी निवेदनातून मुख्यमंत्र्यांना मंगळवारी दिला.आठवड्यापूर्वीच राज्य शासनाने गडहिंग्लज पालिकेला ५ कोटींचा निधी दिला होता. मात्र, गडहिंग्लज कारखान्याच्या राजकारणातून तो निधी तडकाफडकी परत घेतला. त्याबद्दल निषेध नोंदविण्याबरोबरच निधी परत देण्याची मागणी विविध पक्ष-संघटनांतर्फे करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह येथील आर्किटेक्टस् अ‍ॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशन व महेश सलवादे युवा ग्रुपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन हे निवेदन दिले. शहरात नाट्यगृहाची गरज आहे. शहराची गरज आणि लोकभावना लक्षात घेऊन निधी परत द्यावा आणि गडहिंग्लजच्या सांस्कृतिक परंपरेचा सन्मान करावा, अशी मागणी ‘आर्किटेक्टस् अ‍ॅण्ड इंजिनिअर्स’नी केली आहे. शिष्टमंडळात अध्यक्ष शैलेंद्र कावणेकर, उपाध्यक्ष विरुपाक्ष पाटणे, सचिव रमेश गायकवाड यांच्यासह कृष्णात घोरपडे, संदीप पाटील, अमित मिसाळ यांचा समावेश होता. दुटप्पी राजकारण न करता नागरिकांच्या भावना विचारात घेऊन निधी परत द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळात पालिकेतील विरोधी पक्षनेते रामदास कुराडे, वाचनालय सभापती सरिता गुरव, माजी नगराध्यक्ष मंजुषा कदम, अरुणा शिंदे व लक्ष्मी घुगरे, नगरसेवक किरण कदम, हारुण सय्यद, शिक्षण मंडळ सभापती सुरेश कोळकी, आशपाक मकानदार, सुनील गुरव, राजेंद्र तारळे, आदींचा समावेश होता. राजकीय मतभेद बाजूला ठेवूनर् ंविकासनिधी परत द्यावा, अशी मागणी महेश सलवादे ग्रुपने केली आहे. शिष्टमंडळात संतोष कांबळे, मोहन बारामती, दिगंबर विटेकरी, प्रकाश कांबळे, पृथ्वीराज बारामती, अवधूत पाटील, चेतन वालीकर, शुभम बारामती, किरण म्हेत्री, संतोष सलवादे, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)