शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘जीआयएस मॅपिंग’चे काम रखडले

By admin | Updated: May 18, 2017 01:05 IST

दीड महिन्याने मुदत संपणार : काम फक्त २५ टक्केच, मनपा अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : घरफाळ्याची आकारणी चुकविणाऱ्या मिळकतधारकांचा शोध घेण्यासाठी महानगरपालिकेचे माजी आयुक्त पी. शिवशंकर यांनी ‘जीआयएस’ मॅपिंग प्रणालीचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला खरा पण या सर्वेक्षणाचे काम रखडले आहे. त्यावर मनपाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहिले नसल्याचे स्पष्ट झाले. एक चांगल्या कामाचेही तीन तेरा कसे होतात याचे जीआयएस मॅपिंग एक उदाहरण आहे. कोल्हापूर शहराचा विस्तार झपाट्याने होत असून वाढणाऱ्या मिळकतींची नोंद महापालिकेच्या घरफाळा विभागात तितक्याच गतीने होत नाही. वर्षानुवर्षे अनेक मिळकतींना त्यामुळे घरफाळा लागू झाला नसल्याने महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे. ही बाब लक्षात येताच तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर यांनी शहर हद्दीतील सर्व मिळकतींचे जीआयएस मॅपिंग प्रणालीचा वापर करून सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सायबर इन्फोटेक अ‍ॅन्ड कंपनी (ठाणे) यांना काम देण्यात आले. शहरातील सर्व मिळकतींच्या सर्वेक्षणाचे काम निविदेतील अटीप्रमाणे चौदा महिन्यांत पूर्ण करायचे होते, परंतु मुदत संपण्यास अवघ्या दीड महिन्याचा अवधी राहिला असताना १ लाख ३७ हजारांपैकी केवळ १२ हजार ३३५ मिळकतींचे सर्वेक्षण पूर्ण झाले. यावरूनच या कामाची गती स्पष्ट झाली आहे. प्रारंभी ठेकेदारास सी व डी वॉर्डातील सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले होते. दोन वॉर्ड दाट लोकवस्तीचे आहेत, तरीही काम करण्यास विलंब होत आहे. जर १२ हजार ३३५ मिळकतींना एक वर्ष लागणार असेल तर १ लाख ३७ हजार मिळकतींचे सर्वेक्षण पूर्ण होण्यास किती वर्षे लागतील, असा प्रश्नही त्यातून निर्माण झाला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वेक्षणाचे काम घेतलेल्या ठेकेदारावर नगरसेवकांनी आरोप केले होते. मिळकतधारक आणि ठेकेदार कंपनीचे कर्मचारी तोडपाणी करून पैसे कमावत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक राहुल चव्हाण यांनी केला होता. त्यावेळी या कामावर बहुतांशी सर्वच सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तरीही प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या कामावर सध्यातरी कोणाचे नियंत्रण नसल्याचे दिसते.